संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयामुळे जुना मुंबई-पुणे मार्ग सुसाट

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : लष्कराची जागा ताब्यात येत नसल्याने खडकी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. अखेर या रस्त्यासाठी आवश्‍यक असलेली दोन किलोमीटर लांबीची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यास संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा महामार्ग दुपटीने मोठा होऊन ४२ मीटर रुंदीचा होणार असल्याने या भागातील बॉटल नेक संपणार आहे.

Pune
'टेंडरनामा' IMPACT : सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेला निर्देश

पिंपरी-चिंचवडकडून पुण्याकडे येताना पिंपरीच्या हद्दीत एकदम मोठा रस्ता आहे. पण दापोडीनंतर मुळा नदीवरील संत तुकाराम महाराज पूल ओलांडून बोपोडीत आल्यानंतर लहान रस्त्यामुळे कायम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षात महापालिकेने स्थानिकांशी चर्चा करून थोडी थोडी करून जागा ताब्यात घेतल्याने हा रस्ता काही प्रमाणात मोठा झाला, पण खडकीतील लष्कराची जागा ताब्यात येत नसल्याने या रस्त्याचे रुंदीकरण ठप्प झाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातून रोज कामानिमित्त येण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या रस्त्यावर मेट्रोचेही काम सुरू आहे. पण रस्ता मोठा नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Pune
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

पुणे महापालिकेला हा रस्ता ४२ मीटर रुंद करून तेथे बीआरटी बससेवा करायची आहे. त्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यात असलेली ही जागा महापालिकेच्या ताब्यात मिळावी यासाठी महापालिकेने संरक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यासाठी शासकीय पातळीवर बैठका झाल्या होत्या. अखेर ही जागा देण्याचा निर्णय झाला असून, त्याबाबत संरक्षण विभागाकडून महापालिकेला पत्र देण्यात आलेले आहे.

Pune
सोलापुरातील 'या' 17 रस्त्यांचे भाग्य उजळणार! 25 कोटींचे टेंडर...

२.१०० किलोमीटर जागा ताब्यात
संरक्षण विभागाकडून महापालिकेला २.१०० किलोमीटरची जागा ताब्यात दिली आहे. त्यामुळे हा रस्ता मोठा करता येणार आहे. या बदल्यात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून संरक्षण विभागाला येरवड्यातील १०.५८ एकर जागा हस्तांतरित केली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील लष्कराची जागा ताब्यात मिळावी यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू होता. अखेर २१०० मीटर लांबीची जागा महापालिकेच्या ताब्यात येणार असल्याने हा रस्ता आता ४२ मीटर रुंद होईल. त्यामुळे या भागातील वाहतूक गतिमान होईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com