Pune : हजारो कोटी खर्चूनही अपूर्ण मार्गिकांमुळे बीआरटीला ब्रेकच

BRT Pune
BRT PuneTendernama

पुणे (Pune) : पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणाऱ्या पीएमपीचा वेग मंदावत चालला आहे तर दुसरीकडे गतिमान बस सेवेसाठी असलेल्या ‘बीआरटी’च्या दुरवस्थेत वाढ होत आहे. पीएमपी बसचा सरासरी वेग ताशी १३ किलोमीटर तर ‘बीआरटी’मधून धावणाऱ्या बसचा वेग ताशी ३० किमी आहे. या गतीत आणखी वाढ होऊ शकते. मात्र, त्यासाठी बीआरटीचे अर्धवट मार्ग पूर्ण होण्याची गरज आहे. सध्या ‘बीआरटी’ तुकड्यांमध्ये विभागली आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्चूनही त्याचा थेट फायदा प्रवाशांना होत नाही.

BRT Pune
डहाणू-जव्हार-नाशिक मार्गावरील तीन पुलांना मंजुरी मिळाल्याने...

गतिमान बस सेवेसाठी बीआरटी १०० किमीच्या मार्गावर असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर ७२ किमी इतकीच बीआरटी आहे. यात कात्रज-स्वारगेट मार्ग वगळता अन्य ठिकाणच्या बीआरटीची दुरवस्था झाली आहे. स्वारगेट-हडपसर मार्गावर बीआरटीचे अवशेषही शिल्लक राहिले नाहीत तर दुसरीकडे नगर रस्त्यावरील बीआरटी स्थानक नावालाच राहिले आहे. या मार्गावरील तीन स्टेशनची स्थितीही अत्यंत वाईट आहे. त्यामुळे अनेकदा बस बीआरटी सोडून दुसऱ्या मार्गावरून धावते. त्याचा फाटक प्रवाशांना बसत आहे.

BRT Pune
Pune: 'या' एका निर्णयाने बदलली पुण्यातील पुनर्विकासाची गणिते?

आठ बीआरटी; मात्र मार्ग अर्धवट

पुण्यामध्ये तीन तर पिंपरी-चिंचवडमध्ये पाच बीआरटी आहेत. पिंपरीत ५० किमी तर पुण्यात २२ किमीचे क्षेत्रावर बीआरटी बांधली गेली. पुणे व पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या बीआरटी मार्गिका अर्धवट आहेत. यात महापालिका ते निगडी व महापालिका ते किवळे या मार्गाचा विचार केला तर महापालिका ते दापोडी या मार्गावर बीआरटीची मार्गिका नाही तर दापोडी ते निगडी या ठिकाणी बीआरटीची मार्गिका आहे. महापालिका ते सांगवी या मार्गावर सांगवी ते किवळे या दरम्यान १४ किमीचे बीआरटी मार्गिका आहे तर महापालिका ते सांगवी या उर्वरित सात किमीच्या मार्गावर मार्गिका नाही. नाशिक फाटा ते वाकड, निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते वाघोली, काळेवाडी फाटा ते चिखली, स्वारगेट ते कात्रज व नुकतीच सुरु झालेली दिघी ते आळंदी अशा आठ बीआरटी आहेत.

BRT Pune
Pune: चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे काम झाले अन् आता उद्घाटन..

बीआरटीची सद्यःस्थिती :

- बीआरटी थांब्यांची दुरवस्था

- नगर रस्ता व आळंदी रस्त्यांचे थांबे नावालाच

- अनेक ठिकाणी दरवाजे तुटलेले

- रात्री अनेकदा मद्यपींकडून वापर

- छत गळके, अस्वच्छ परिसर

बीआरटी का महत्त्वाची?

- पीएमपीच्या रोज सुमारे १६५० बस धावतात

- प्रत्येक बस किमान २२५ किमी धावते

- सर्व बस एक दिवसांत तीन लाख ६० हजार किमीचा प्रवास करते

- बसचा सरासरी वेग ताशी १३ किमी तर बीआरटीमधून धावणाऱ्या बसचा वेग सरासरी ३० किमी

- प्रवाशांच्या वेळेत बचत

- कमी बसच्या संख्येत जास्तीच्या फेऱ्या देणे शक्य

‘बीआरटी’ अर्धवट का राहिली?

- वाहतूक कोंडी होईल, या गैरसमजातून काही मार्गांवर नागरिकांचा विरोध

- काही ठिकाणी राजकीय व्यक्तींचा आंदोलनाद्वारे विरोध

- पुणे व पिंपरी महापालिकेच्या निधीची गरज

- विरोधामुळे दोन्ही महापालिकांची निधी देण्यास टाळाटाळ

- पुणे महापालिकेने २०१२ पासून निधीच दिला नाही

- थांब्यांच्या देखभालीसाठी निधीची तरतूदच नाही

- देखभाल-दुरुस्तीसाठी किमान २०० कोटींचा खर्च अपेक्षित

अशी आहे स्थिती

६७४

- बीआरटीमधून धावणाऱ्या बस

१२७

- एकूण मार्ग

१,५५,५४८ किमी

- रोजचा प्रवास

६४ किलोमीटर

- एकूण अंतर

७८५८

- दिवसभरातील फेऱ्या

११५

- एकूण बसथांबे

४,८९,७४०

- रोजची प्रवासी संख्या

७४ लाख रुपये

- दैनंदिन उत्पन्न

बीआरटीमधून धावणाऱ्या पीएमपीचा वेग हा अन्य मार्गांवर धावणाऱ्या बसच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने बीआरटी सेवा अधिक फायदेशीर आहे. त्याचा विस्तार होणे गरजेचे आहे. नागरिकांनी बीआरटीला विरोध करू नये.

- अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com