कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कामांबद्दल मंत्र्यांनी काय दिल्या सूचना?

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश
shivendraraje bhosale
shivendraraje bhosaleTendernama
Published on

मुंबई (Mumbai): कोल्हापूर व सातारा भागात लवकरच ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. कारखान्यांना ऊस नेण्यासाठी कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या महामार्गावरील भुयारी मार्गांची व सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

shivendraraje bhosale
दिन दिन दिवाळी, सगळ्यांना कंत्राटदार ओवाळी... सरकार कोणाचे, कंत्राटदारांचे!

कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

यावेळी आमदार मनोज घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, उपसचिव सचिन चिवटे आदी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

shivendraraje bhosale
Nashik CCTV Tender Scam: नाशिक कुंभमेळ्याच्या CCTV टेंडरमध्ये मोठा घोटाळा

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. भुयारी मार्ग व सेवा रस्त्यांच्या कामांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी कामांना वेग देण्याच्या सूचना कंत्राटदारांना द्याव्यात.

तसेच ऊस गाळप हंगामात या महामार्गावरच ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील स्लिप रस्ते, कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील वळण मार्गावरील कामे पूर्ण करून तो रस्ता वाहतुकीस योग्य करावा. तसेच भुयारी मार्गाजवळील पर्यायी रस्ते सुस्थितीत करण्यात यावीत. जेणेकरून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही.

shivendraraje bhosale
Water Taxi In Mumbai: आता गेटवे ऑफ इंडियाहून थेट गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था ठेवण्यात यावी. तसेच या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येऊन त्यांची सेवा कोल्हापूर व सातारा पोलिसांच्या अखत्यारित देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

भुयारी मार्गाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथे ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्यात येतील. तसेच वळण रस्त्यांच्या ठिकाणचा रस्ता सुव्यवस्थित करण्यात येईल. कराडमधील रस्त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्रीवास्तव यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com