Whatsapp Messages पाठविण्यासाठी काढले टेंडर

१३ तहसील व ६ उपविभागीय कार्यालयात मिळणार अद्ययावत माहिती
Whatsapp Messages पाठविण्यासाठी काढले टेंडर

कोल्हापूर (Kolhapur) : जिल्ह्यातील महसूलसाठी (Revenue Department) लागणारा सर्व टेडा (Data), माहिती (Information), सर्व्हे (Survey), परिक्षण, कृषी (Agriculture) योजनांची माहिती एकाच मोबाईल ऍपवरून (Mobile APP) दिली जाणार आहे. "ऑनलाईन डायनॅमिक रिपोर्टिंग सॉफ्टवेअर आणि ऑटोमॅटिक व्हॉटस्ऍपवर संदेश पाठवणारे ऍप तयार केले जाणार असून असे ऍप तयार करणाऱ्या कंपन्यांकडून जिल्हा प्रशासनाने टेंडर (Tender) मागविले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १३ तहसीलदार कार्यालये व ६ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यायलायत हे ऍप कार्यान्वित होणार आहे.

Whatsapp Messages पाठविण्यासाठी काढले टेंडर
राज्यात महाविकास आघाडी सरकार तरीही टेंडरचे हकदार भाजपचे ठेकेदार

जिल्ह्यातील महसूल, कृषीसह इतर विभागाची माहिती गावागावापर्यंत पोचली पाहिजे. ज्याठिकाणी कोणतेही माध्यम पोचत नाही, अशा ठिकाणच्या लोकांना शासकीय सर्व योजनांची माहिती मिळावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील सूचना, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील आणि शेवटच्या लाभार्थांपर्यंत पोचतो किंवा नाही याचीही नोंद या ॲपद्वारे घेता येणार आहे. "ऑनलाईन डायनॅमिक रिपोर्टिंग सॉफ्टवेअर आणि ऑटोमॅटिक व्हाटस् संकेतस्थळावर संदेश पाठवणारे ॲप तयार केले जात आहे. याचा जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना निश्चितपणे फायदा होणार आहे. सध्या मोबाईल ब्रॉडकास्टिंगमधून एकावेळेला २५६ लोकांनाच संदेश पाठवता येतात. याउलट या ॲपद्वारे एकावेळी १६०० जणांना संदेश पाठविण्याची सुविधा असणार आहे.

Whatsapp Messages पाठविण्यासाठी काढले टेंडर
पुण्यात ५८ कोटींचे टेंडर मंजूर अन् भाजप नेत्यांची टुर्रर्र...

सध्या एखादा संदेश दिला तर त्यामध्ये काही मोडतोड केली जाते. तो संदेश इतरांपर्यंत जात असताना चुकीचा किंवा अपूर्ण जातो. लोकांचा गैरसमज होवू शकतो. तसेच, अशा संदर्भहिन संदेशाचा विपर्यास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दिलेला संदेश जसाच्या तसा आणि वेळेत जावा यासाठी या ऍपचा वापर केला जाणार आहे.

Whatsapp Messages पाठविण्यासाठी काढले टेंडर
ई-टेंडर घोटाळ्यातील कंत्राटदारांना तब्बल सहा वर्षांनी शिक्षा

ऍप तयार करण्यासाठी मुदत वाढवली
"ऑनलाईन डायनॅमिक रिपोर्टिंग सॉफ्टवेअर आणि ऑटोमॅटिक व्हाटस् ऍपवर संदेश पाठवणारे ऍप तयार केले जात आहे. यासाठी प्रशासनाच्यावतीने निविदा मागविण्यात आली आहे. याला मंगळवार (ता. 16) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. निविदेची सर्व माहिती www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Whatsapp Messages पाठविण्यासाठी काढले टेंडर
मुंबईतील रस्त्यांसाठी पुन्हा एक हजार कोटींची नवी टेंडर

या ऍऍपद्वारे जिल्ह्यातील सर्व माहिती, संदेश, योजना लोकांपर्यंत पोचवण्यास मदत होणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रायोगित प्रकल्प असून तो कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे महत्त्व समोर येणार आहे.
- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com