महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात उभारणार 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'; सरकारचा काय आहे प्लॅन?

Prof. Ram Shinde: सिना नदीवर होणार 2 बुडीत बंधारे; 150 कोटींचे बजेट
Statue of unity
Statue of unityTendernama
Published on

मुंबई (Mumbai): श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी राज्य सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चौंडीच्या सिना नदीवर 2 बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे.

Statue of unity
Pune: पुणे महापालिकेचा 'तो' प्रकल्प आता LPG वर चालणार

यासाठी 150 कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने 21 लाख रुपये मंजूर केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सिंचन, पाणीपुरवठा, नदीपात्राचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड) येथे 6 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या 'श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्यास' सरकारने मंजुरी दिली होती. या आराखड्यासाठी 681 कोटी 32 लाख रुपये खर्चाच्या मान्यता देत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता.

त्यानंतर पावसाळी अधिवेशनात चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने 360 कोटींचा निधी मंजूर केला होता. आता चौंडी येथील सिना नदीवर 2 बुडीत बंधारे बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी यासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करत प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी 21.13 लाख खर्च मंजूर करण्यात आला आहे, हे काम महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे.

Statue of unity
कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना दिलासा; कोर्टाच्या निर्णयामुळे काय होणार फायदा?

या कामामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होणार आहे. तसेच नदीत पाणीसाठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे सुशोभीकरण, नदीत भव्य पुतळा, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने व खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ, चौंडी परिसरातील ऐतिहासिक, पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहचावे, जगाला प्रेरणा मिळावी, यासाठी चोंडीत राष्ट्रीय स्मारक उभारत आहोत. या प्रकल्पासाठी महायुती सरकारने एकूण 1091 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सिना नदीवरील दोन बुडीत बंधाऱ्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे सर्वेक्षणण सुरू होणार आहे. त्यानंतर बंधाऱ्याच्या कामाला आणखीन 100 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. चौंडी विकास प्रकल्पासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनःपूर्वक आभार.

- प्रा. राम शिंदे, सभापती, विधानपरिषद

Statue of unity
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-1 सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करा

सिना नदीवरील हे दोन बुडीत बंधारे केवळ सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठीच उपयुक्त ठरणार नाहीत, तर चौंडीच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना देतील. नदीपात्रातील पाणीसाठा व सौंदर्य वाढल्याने येथे बोटिंग, लेझर शो, लाईटिंगसह विविध सुविधा उभारल्या जातील. पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्र निर्माण होऊन स्थानिक रोजगार वाढेल. चौंडीला येणाऱ्या भाविक-पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येईल. या बंधाऱ्यांमुळे चौंडी हे धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल.

असा आहे विकास आराखडा

- चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन – ६८१ कोटी ३२ लाख

- चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे – ३६० कोटी

- सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे – १५० कोटी (पहिला टप्पा तरतुद ५० कोटी)

- एकूण मंजूर निधी– १०९१ कोटी ३२ लाख + मिळणारा वाढीव निधी १०० कोटी त्यानुसार एकूण निधी होणार ११९१ कोटी ३२ लाख रुपये.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com