Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationTendernama

Solapur : 'स्मार्ट' सोलापुरातील 'त्या' 46 'स्मार्ट प्रकल्पां'ची काय आहे सद्यस्थिती?

Published on

सोलापूर (Solapur) : स्मार्ट सिटी (Smart City) व महापालिकेच्यावतीने (SMC) विकसित करण्यात आलेल्या शहरातील ४६ प्रकल्पांना भेट देत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रकल्पांची सद्यःस्थितीची जाणून घेतली.

Solapur Municipal Corporation
'त्या' कारणांमुळे विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरचे लटकले भूसंपादन

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले पार्क स्टेडियम, लाईट अँड साउंड शो, लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर तलाव सुधारणा, अँडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बाजार या ठिकाणी आयुक्त ओम्बासे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थिती होते.

सोलापूर महापालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क मैदानात पहिल्या टप्प्यात मैदानावरील ११ मुख्य (पीच) खेळपट्ट्या तसेच ६ सराव खेळपट्ट्या (पिच) तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पॅव्हेलियन इमारत, पंचकक्ष, व्हीआयपी कक्ष आणि माध्यम कक्ष उपलब्ध आहे.

Solapur Municipal Corporation
Mumbai : म्हाडाच्या 'त्या' पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने टेंडर काढा

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील सिद्धेश्वर तलाव परिसरात नागरिकांकरीता संगीताच्या तालावर व कारंज्यावर आधारित लाईट अँड साऊंड शो, लक्ष्मी मार्केट हेरिटेज स्ट्रक्चरचा पुनरुज्जीवन १०० वर्षांपूर्वीचे लक्ष्मी मार्केट नुतनीकरण करण्यासाठी डिझाईन तयार करणेत आलेले आहे.

त्याठिकाणी १००० ओटे व मसाला विक्री करण्याकरिता १०० गाळे बांधण्यात येणार आहेत, त्याची माहिती आयुक्तांनी घेतली. तसेच श्री सिद्धेश्वर तलाव सुधारणा, सिध्देश्वर तलावाचे पुर्नज्जीवन करणे, सदर प्रकल्पाअंतर्गत सिद्धेश्वर तलावाची स्वच्छता व साफसफाई, तलावाच्या सभोवताली वॉकिंग ट्रॅक, सुशोभीकरण आदी कामांच्या संदर्भातील माहिती आयुक्तांनी घेतली.

Tendernama
www.tendernama.com