Solapur : न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहिम लांबणीवर

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : शहरातील विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमित खोकी व दुकाने हटविण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविली होती. या नोटीशी विरोधात अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने फेरसर्व्हे करण्याचे आदेश दिला असून पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम दोन महिने लांबणीवर पडली आहे.

Solapur Municipal Corporation
Solapur : समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर नवा करार; समांतर जलवाहिनीसाठी अजूनही वेटिंग

महिन्याभरापूर्वी शहरातील विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उभारण्यात आलेली बांधकामे आणि अतिक्रमित खोकी व दुकाने दहा दिवसांत नागरिकांनी स्वत:हून काढून घ्यावीत, अन्यथा महापालिकेकडून काढण्यात येतील, अशी नोटीस महापालिकेने दिली होती. त्यानंतर महापालिका, राष्ट्रीय महामार्ग, पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या मार्गाची पाहणी केली. सर्व्हिस रस्त्यात अतिक्रमित होणाऱ्या कच्च्या व पक्क्या बांधकामावर खुणा केल्या होत्या. या नोटिशीच्या विरोधात अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या सर्व्हिस रोडचा फेरसर्व्हे करण्यात यावा, असा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार असून अतिक्रमण काढण्याला स्थगिती मिळाली आहे.

Solapur Municipal Corporation
Pune : महापालिकेवर मिळकतकराची बिल आकारणी थांबविण्याची नामुष्की; कारण काय?

९५ जणांनाच नोटीस

विजापूर महामार्गाला दोन्ही बाजूंनी १२ मीटरचा सर्व्हिस रोड आहे. कच्चे, पक्के बांधकाम, टपऱ्या असे एकूण १९६ अतिक्रमण आहेत. मात्र महापालिकेने ९५ जणांनाच नोटीस दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आता फेरसर्व्हे होणार आहे.

महापालिकेच्यावतीने सर्व्हिस रोडची हद्द निश्चितीही करण्यात आली होती. या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात तात्पुरते स्ट्रक्चर, खोके, कंपाउंड भिंत, गेट उभारण्यात आले आहेत. हे अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात येऊन या महामार्गावरील सर्व्हिस रोडची जागा पूर्णपणे खुली करण्यासाठी नोटीस दिली होती. अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे कारवाई लांबणीवर पडणार आहे.

- तैमूर मुलाणी, उपायुक्त

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com