Solapur : सोलापुरातील 'त्या' साडेतीन हजार ग्राहकांना 25 वर्षे वीजबिलातून मुक्तता; काय आहे कारण?

Power
PowerTendernama

सोलापूर (Solapur) : छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पश्चिम महाराष्ट्रातील २४ हजार ३८७ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे ‘महावितरण’चे वीजबिल २५ वर्षे येणार नाही, अशी ही योजना आहे. प्रकल्पातून निर्माण झालेली वीज स्वत: वापरून जास्त झालेली वीज ‘महावितरण’ला विकता येणार आहे.

Power
Pune : म्हाळुंगे-माणसह 5 टीपी स्कीमबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय; तब्बल 800 कोटींचा

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणपूरक सौरऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात सौरऊर्जा निर्मितीला चालना दिली जात आहे. संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांचाही त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

केंद्र शासनाने २०२२ ते जानेवारी २०२४ पर्यंत छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी घरगुती ग्राहकांसाठी राज्याला १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले आहे. दीड वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील ३ हजार ८८५ घरगुती ग्राहकांनी छतावर तब्बल १७.०४ मेगावॅट (१७ हजार ४७ किलोवॅट) क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत.

घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान मिळते. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेच्या ग्राहकांना २० टक्के अनुदान दिले जाते.

Power
एका ठेकेदाराचा अर्ध्यावर डाव तर दुसऱ्याची धूम; 'या' महामार्गाच्या पूर्णत्वाला मिळेना गती

...तर २५ वर्षे वीजबिलापासून मुक्ती

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान मिळते. सौर प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्ष त्याचा लाभ होतो.

सोबतच सौर प्रकल्पाच्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून संबंधित ग्राहकाच्या वीजबिलात समायोजित केली जाते. त्याचा मोठा आर्थिक फायदा ग्राहकांना होत असल्याचा विश्वास पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी व्यक्त केला.

Power
Pune : नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!

‘येथे’ मिळेल सविस्तर माहिती...

छतावर सौर पॅनेलद्वारे वीजनिर्मितीत सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत तीन हजार ३९४ ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. सध्या त्या माध्यमातून ५१.२ मेगावॅट वीज तयार होईल. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ऑनलाइन अर्ज, एजन्सीसह इतर माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर व www.mahadiscom.in/ismart या पोर्टलवर उपलब्ध आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com