Smart City Solapur: स्मार्ट सिटीच्या कामांची होणार तपासणी; लवकरच टेंडर

Tender News: वर्कऑर्डर दिल्यानंतर महिनाभरातच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार
स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी
Solapur Municipal CorporationTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : सोलापूर शहरातील ५४ मीटर रस्त्यामधील अतिक्रमण काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. त्यानंतर या रस्त्यापैकी २०० मीटर अंतराचा रस्ता करण्यासाठी स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीतून १.९० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. (Smart City Solapur Tender News)

स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी
Devendra Fadnavis: राज्यातील 'त्या' 3 लाख शेतकऱ्यांना CM फडणवीसांनी काय दिली खुश खबर?

महिनाभरात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्कऑर्डर दिल्यानंतर महिनाभरातच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दुसरीकडे श्री सिद्धेश्वर तलावातील पाण्यामधील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी लवकरच एरिएटर बसवण्यात येणार आहेत. यासोबतच स्मार्ट सिटीसह इतर विविध विकासकामांची बाह्य संस्थेकडून लवकरात लवकर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने दिली आहे.

श्री सिद्धेश्वर तलावातील ऑक्सिजन पातळी वाढविण्याचे प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. नैनिताल येथील तलावाच्या धर्तीवर जवळपास ५७ लाख रुपयांच्या निधीतून १४ एरिएटर्स तलावात बसवण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी योजना व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांची व विकासकामांचीही तपासणी सीआयएल ही बाह्य संस्था करणार असल्याचे समजते. त्यासाठीचे टेंडरदेखील लवकर काढण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी
Ajit Pawar: ऐन निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय दिली गुड न्यूज?

३१ अतिक्रमणे हटविणार

शहरातील पंचकट्टा ते राणी लक्ष्मीबाई मार्केटपर्यंतच्या रस्त्यावरील ३१ अतिक्रमणे लवकरच काढण्यात येणार आहे. मोजणी करून अतिक्रमण झालेल्या जागाही निश्चित केल्या आहेत. संबंधितांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढले जाणार आहे.

सध्या तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी चार ऐवजी १.३ तर पीएच ९.४ आहे, जो ७ असायला हवा. एरियटर्स लावूनही तलावातील ऑक्सिजन पातळी वाढली नाही तर दुसऱ्या टप्प्यात आरओ यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

- डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com