Radhakrushna Vikhe : 'निळवंडे'च्या 'या' कामासाठी साडेचारशे कोटी; 5 स्वतंत्र टेंडर

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilTendernama

नगर (Nagar) : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कामासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याने निळवंडे कालव्‍यांच्‍या अस्‍तरीकरण कामासाठी साडेचारशे कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली. या कामाचे टेंडरही प्रसिद्ध झाले आहे. यापुढे निळवंडे कालव्यांच्या कुठल्याही कामाला निधीची कमी पडणार नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Nashik : नाशिक तालुक्यात मध्यरात्री प्रशासनाची मोठी कारवाई; सारूळच्या 5 क्रशरवर...

शिर्डी (जि. नगर) येथे बोलताना विखे म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाच्या जल नियोजनानुसार धरणातील आठ टीएमसी पाणी साठ्यापैकी साडेसहा टीएमसी पाण्‍याच्‍या साठ्यातून सुमारे ६८ हजार ८७८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्‍याचे उद्दिष्ट आहे. मात्र एवढे मोठे क्षेत्र पारंपरिक पद्धतीने भिजविणे आव्‍हानात्‍मक असल्‍याने कालव्‍याचे अस्‍तरीकरण करण्‍याचा धोरणात्‍मक निर्णय घेण्यात आला. त्‍यानुसार खुल्‍या कालव्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या अस्‍तरीकरणाच्‍या नियोजनाचा प्रस्‍ताव तयार करण्‍यात आला होता. आपण त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मिळाला.

Radhakrishna Vikhe Patil
Nashik : शिंदे गटाची भाजपवर मात! नाशिकचे IT पार्क आता राजूर बहुल्यात

अस्‍तरीकरणाची एकच टेंडर मंजूर केल्‍यास कामे वेळेवर होणार नाहीत. हे लक्षात घेऊन या अस्‍तरीकरणाच्या कामाचे पाच भागात विभाजन करण्‍यात आले. याबाबतच्‍या पाच स्‍वतंत्र टेंडर प्रसिद्ध झाल्‍या आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com