
कोल्हापूर (Kolhapur) : रंकाळा तलावाच्या (Rankala Lake) नियोजित कामाचे टेंडर (Tender) विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करावी, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kashirsagar) यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केली. ऋतुराज क्षीरसागर, अरूण गवळी उपस्थित होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी ९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीतून पर्यटन वाढीच्या दृष्टीने नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
क्षीरसागर म्हणाले, ‘‘शासन निर्णयानुसार २५ टक्के हिस्सा हा महापालिकेचा असणार आहे. महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या आराखड्यामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने निधी विनियोग होईल अशी कामे प्राधान्याने होणे गरजेचे आहे. माध्यमांचे प्रतिनिधी वारंवार रंकाळा तलावाच्या सुधारणेविषयी बातम्यांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधत असतात. जाणकार नागरिकही याबाबत प्रशासनास विविध सूचना करत असतात. त्यांच्या सूचनांचाही विचार कामे होताना करावा. देखभाल दूरूस्तीची कामे नव्याने निघणार नाहीत याची काळजी घ्यावी.’’ पर्यटकांना आकर्षित करतील अशी सेल्फी पॉइंन्ट, सनसेट पॉइंन्ट, वॉटर लाईट शो आणि म्युझिकल फौंटेन्ससारखी कामे करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या.
काळी फीत लावून उपस्थिती सीमा लढ्यास बळ देण्यासाठी क्षीरसागर यांनी काळी फीत लावून उपस्थिती लावली. बेळगावमध्ये आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. त्यास क्षीरसागर यांना पाठिंबा दिला.