Chhagan Bhujbal: कोपरगाव-येवला-मनमाड चारपदरी काँक्रिट रस्त्याला ग्रीन सिग्नल

येवला शहर बायपास रस्त्याचा डीपीआर लवकर तयार करा, मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalTendernama
Published on

मुंबई (Mumbai): स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या भावना लक्षात घेऊन कोपरगाव येवला मनमाड एनएच १६० एच आणि एनएच ७५२ जी चौपदरी काँक्रिट रस्त्यासह येवला बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर सादर करावा. तसेच याठिकाणी बायपास रस्ता बांधणीच्या दृष्टीने कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis: प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

मंत्रालयात कोपरगाव येवला मनमाड एनएच १६० एच आणि एनएच ७५२ जी चौपदरी कॉक्रींट रस्त्यासह येवला बायपास रस्ता सविस्तर प्रकल्प अहवालाच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले.

भुजबळ यांनी सूचित केले की, कोपरगाव येवला मनमाड एनएच १६० एच आणि एन.एच.७५२ जी चौपदरी काँक्रीट रस्त्यासह येवला बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना भविष्यातील शहराचा वाढता विकास लक्षात घेऊन पर्यायी मार्ग निवडावा तसेच त्यासाठीच्या आवश्यक यंत्रणांच्या मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण होईल, हे लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करावा. 

बायपास रस्त्याची व्यापक उपुयक्तता लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टीने बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर सादर करण्याचे मंत्री भुजबळ यांनी सूचित केले.

Chhagan Bhujbal
Chakan Traffic: चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार; कारण...

यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड अडचणींना सामोर जावे लागत असून येवला-मनमाड या रस्त्यावर वाहनांची गर्दी, वाढती वर्दळ, वाहन संख्या लक्षात घेऊन तातडीने याठिकाणी पर्यायी रस्त्यावर वाहूतक विशेषतः जड वाहनांची वाहतूक वळवण्याची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने वाहतूक नियंत्रण पोलीस यंत्रणांनी आणि जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने या रस्त्यावरील वाहूतक अन्य पर्यायी रस्त्याकडे वळवावी.

त्याचप्रमाणे वाढत्या प्रमाणातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दररोज होत असलेला मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय या सर्व बाबी समजून घेत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही यंत्रणांनी हा वाहतूक कोंडीचा प्रश्न तत्परतेने सोडवावा. यासाठी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ या सर्व यंत्रणांनी समन्वयाने तातडीने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी.

Chhagan Bhujbal
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील कोंडी फुटणार; डिसेंबरचा मुहूर्त

या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, यांच्यासह वाहतूक अपर पोलिस महासंचालक प्रविण साळुंखे, दूरदृश्यप्रणाली द्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे राज्याचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, एनएचएआय प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे, छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक परिवहन विजय कोथळे, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसिलदार आबा महाजन, कार्यकारी अभियंता सा.बां नाशिक मुकेश ठाकूर, येवला नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com