Satara : पुसेगावचा ब्रिटिशकालीन पूल धोकादायक; कायम वर्दळ असल्‍याने अपघाताची शक्‍यता

 River
RiverTendernama
Published on

पुसेगाव (Pusegaon) : येथील कायम वर्दळ असलेल्या जुन्या बुध रस्त्यावरील जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन पुलाच्या सळ्या उघड्या पडल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे.

 River
Mumbai-Pune Expressway : मिसिंग लिंकअंतर्गत दोन्ही बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्णत्वास; येत्या 4 महिन्यात...

गतवर्षी आरपार मोठे भगदाड पडल्यानंतर या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. त्यामुळे पुलावरील वाहतूक काही कालावधीसाठी सुरक्षित झाली होती. मात्र, सद्यःस्थितीत पूल जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे. अशातच पुलाच्या स्लॅबच्या सळ्या उघड्या पडल्याने भविष्यात हा पूल कधीही कोसळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने कमकुवत झालेला जुना पूल पाडून नवीन पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. गावातील गोरेवस्ती, तोडकरवस्ती तसेच पुसेगाव आणि नेर हद्दीतील नवीन वसाहतीस जोडणाऱ्या लेंडोरी ओढ्यावरील या पुलाच्या पलीकडे असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवसाहती आहेत. येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने या पुलावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांची सतत वाहतूक सुरू असते. सदर परिसर डेव्हलपमेंट फेजमध्ये असल्याने बांधकामासाठी लागणारे वीट, वाळू, सिमेंट, स्टील आदी अवजड साहित्याची वाहतूक याच रस्त्यावरून केली जाते.

 River
Mumbai Pune Expressway : 'द्रुतगती'वरून जाणाऱ्या 5 लाख वाहनांना 'दणका'

या भागातील विद्यार्थ्यांसाठी स्‍कूलबस देखील याच रस्त्यावरून ये- जा करतात, तसेच पुसेगाव- नेर येथील बहुतांश शेतकरी शिवारातील शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची तसेच शेतमालाची ने- आण करण्याकरिता या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परिणामी, या पुलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. हा पूल झाल्यापासून आजपर्यंत कुठलीच पाहिजे तशी दुरुस्ती झालेली नाही. गतवर्षी पुलावर पडलेल्या भगडादाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, आता अवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत आणि जीर्ण झाला आहे. परिणामी, या पुलाची अवस्था भयानक झाली आहे. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल वाहतुकीसाठी बांधणे आवश्यक झाल्याचे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आम्ही शेकडो नागरिक तसेच अनेक विद्यार्थी आणि शेतकरी दररोज या पुलावरून ये-जा करीत असतो. सद्यःस्थितीत कमकुवत झालेल्या या पुलाची अवस्था धोकादायक बनली असून, जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यात लक्ष घालून लवकरात लवकर नवीन पूल बांधावा.

- दीपक तोडकर, ग्रामस्थ, तोडकर वस्ती (पुसेगाव)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com