Water pipeline
Water pipelineTendernama

Solapur : समांतर जलवाहिनीसाठी सरकारकडून 89 कोटी; युवा आमदारांच्या पाठपुराव्याला यश

Published on

सोलापूर (Solapur) : समांतर जलवाहिनीच्या कामासाठी ९० कोटी रुपयांच्या निधीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवा आमदार देवेंद्र कोठे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून समांतर जलवाहिनीसाठीचा ८९ कोटी २९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश गुरुवारी नगर विकास विभागाने काढले आहेत. यामुळे समांतर जलवाहिनीचे काम पूर्ववत सुरू राहणार आहे.

Water pipeline
Pune : चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDAने प्रस्तावित केलेल्या मार्गासाठी लवकरच टेंडर

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी जलवाहिनीसाठी एकूण ८८२ कोटी रुपयांचा दुहेरी जलवाहिनी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कामास सुरवात झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शासन हिश्शांपैकी ९० कोटी रुपयांचा निधी लवकर मिळणे गरजेचे होते. यासाठी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा निधी तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते.

Water pipeline
Mumbai : MMR क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता

दुहेरी जलवाहिनीबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत निधीबाबतच अडचण जाणून घेतली होती. मुख्यमंत्र्यांकडे निधीबाबत त्यांनी व आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने समांतर जलवाहिनीच्या कामातील अडचण दूर झाली आहे.

समांतर जलवाहिनीसाठी शासन हिश्शापोटी २६७.८८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यापैकी यापूर्वी ८९कोटी २९ लाख रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला असून हा दुसरा हप्ता देखील वितरित करण्याचे आदेश मिळाल्याने समांतरच्या कामाला गती मिळणार आहे.

समांतर जलवाहिनीसाठी आवश्यक निधीबाबत मी व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निधी देण्याची सूचना केली होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह इतर सर्व प्रश्न सोडवून शहराच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहील.

- देवेंद्र कोठे, भाजप आमदार शहर मध्य

Tendernama
www.tendernama.com