Satara : साताऱ्याहून मुंबईकडे जाणारा 'हा' रस्ता 2 दिवस 6 तास बंद

New Katraj Tunnel
New Katraj TunnelTendernama

सातारा (Satara) : सातारा (Stara) किंवा कोल्हापूरवरून (Kolhapur) तुम्ही मुंबईच्या (Mumbai) दिशेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, सातारा ते मुंबई (Satara To Mumbai) या महामार्गावर एका ठिकाणची वाहतूक दोन दिवस प्रत्येकी तब्बल सहा तास तास बंद राहणार असल्याने ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

New Katraj Tunnel
CS: सातारा - देवळाईकरांच्या रस्त्यांची कोणी लागली वाट?

कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत, तसेच, २३ मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून २४ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

New Katraj Tunnel
Nashik: Neo Metro प्रकल्पात का झाली पीएमओची एन्ट्री?

या कालावधीत सातारा - मुंबई रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्गे कात्रज चौक, नवले पूल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरून मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

New Katraj Tunnel
MSRTC: एसटीचा क्रांतिकारी निर्णय; 5 हजार ई-बसेससाठी निघाले टेंडर

व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com