Belgaum
BelgaumTendernama

बेळगाव पालिकेने काढले 'हे' नवे टेंडर

बेळगाव (Belgaum) : बेळगाव शहरातील (Belgaum City) कॅंटीलिव्हर व गॅंट्रीजवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी महापालिकेने ई-लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. १९ एप्रिल रोजी ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. बेळगाव शहरात महापालिका हद्दीत चार ठिकाणी गॅंट्रीज आहेत. त्यावर एका बाजूला दिशा व मार्ग दर्शविणारी माहिती आहे. दुसऱ्या बाजूला जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुभा आहे. त्या जाहिरातीच्या कर वसुलीचा ठेका महापालिकेकडून दिला जातो.

Belgaum
'या' जिल्ह्यासाठी 'गुड न्यूज'; विकासाची गाडी आता सुस्साट...

या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना ३ हजार ८०० रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. गॅंट्रीजवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्याच्या लिलावासाठी १ लाख ४९ हजार ३०० रूपये इतकी मूळ बोली निश्‍चित करण्यात आली आहे. ई-लिलावात भाग घेणाऱ्यांना त्यापुढे बोली लावावी लागणार आहे. शहरात तब्बल २० ठिकाणी कॅंटीलिव्हर आहेत. त्यावरील जाहिरात कर वसुलीचा ठेका दिला जाणार आहे.

Belgaum
नवी मुंबई महापालिकेत टक्केवारीचा बोलबाला; माननियांना हाव सुटेना!

कॅंटीलिव्हरच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांना ९ हजार ४०० रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. शिवाय ३ लाख ७३ हजार २४० रूपये इतकी मूळ बोली निश्‍चित करण्यात आली आहे. इच्छुकांना त्यापुढे बोली लावावी लागणार आहे. दोन्ही लिलाव प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावणाऱ्याला जाहिरात कर वसुलीचा ठेका दिला जाणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांना १४ एप्रिल ही अंतिम तारीख आहे.

Belgaum
वसुलीच्या ‘टार्गेट’चा ताप; कंत्राटदार, कर्मचाऱ्यांकडूनही वर्गणी

बेळगाव शहरातील खासगी व महापालिकेच्या मालकीच्या जागेतील सुमारे १८० होर्डींग्ज, दुभाजकावरील मेडीयन्स, गॅंट्रीज व कॅंटीलिव्हर या माध्यमातून महापालिकेला जाहिरात कर मिळतो. पण जाहिरात कर महापालिकेकडून थेट वसूल केला जात नाही. यासाठीचा ठेका दिला जातो. ज्या कंपनीला जाहिरात कर वसुलीचा ठेका मिळेल त्या कंपनीकडून रीतसर परवानगी घेवून व निर्धारीत शुल्क भरून वरील ठिकाणी जाहिरात करता येते. बेळगावात वरील सर्व प्रकारच्या जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी स्पर्धा असते. पण १८० होर्डींग्जच्या जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी सहावेळा लिलाव प्रक्रिया आयोजित करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे होर्डींग्जवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठीच्या लिलाव प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

Belgaum
कंत्राट संपताच 'क्लीनअप मार्शल'ला पालिकेने का दिला डच्चू?

गॅंट्रीज व कॅंटीलिव्हरवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्याची मुदत संपली आहे. मुदत संपूनही जुन्या ठेकेदारांकडूनच जाहिरात कर वसुली केली जात असल्याची तक्रार आमदार अभय पाटील यानी केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी एक पथकही बेळगावात आले होते. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com