Akola: 10 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना महापालिकेचा इशारा

थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार
Akola Municipal Corporation
Akola Municipal CorporationTendernama
Published on

अकोला (Akola) : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील पाणीपट्टी कर संकलन वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अवैध नळजोडण्या तसेच पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून थकबाकीदारांचे नळजोडणी खंडित करण्याची मोहीम मनपाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. दहा हजार व त्यापुढील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असून, नळ कनेक्शन कापले जाणार आहेत.

Akola Municipal Corporation
नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

महानगरपालिका प्रशासनाकडून गेल्या सात ते आठ वर्षांपासून थकीत असलेल्या पाणीपट्टीच्या वसुलीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. ज्या नळ धारकांकडे पाणीपट्टीची रक्कम बरेच दिवसांपासून थकीत आहे किंवा ज्यांनी पाण्याचा वापर करत असूनही नोंदणी न करता अवैध नळजोडणी घेतलेली आहे, अशा नागरिकांविरोधात कठोर पावले उचलली जाणार आहेत.

अवैध नळ कनेक्शन आणि थकीत पाणीपट्टीमुळे मनपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून शहरातील जल व्यवस्थापन कार्यक्षमतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

महानगरपालिकेच्या वतीने सद्य:स्थितीत २५ मिटर रिडर नेमण्यात आले आहेत. हे मिटर रिडर संपूर्ण शहरात मिटर रिडींग घेण्याचे काम करत असून, नळ धारकांकडून पाणीपट्टी कराची रक्कम स्वीकारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांना सहकार्य करून पाणीपट्टीची रक्कम वेळेत भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Akola Municipal Corporation
Adani: मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अदानी समूहाला; तब्बल सतराशे कोटींचे कंत्राट

पाणीपुरवठा खंडित होणार
शहरातील अनेक ठिकाणी अवैध नळजोडण्या घेऊन नागरिक पाणी वापरत आहेत. मनपाने कठोर पवित्रा घेत, नियम न पाळणाऱ्यांच्या नळजोडण्या थेट खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. ज्या घरगुती नळधारकांकडे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे त्यांनी तत्काळ देयकाची पूर्तता करावी. अन्यथा त्यांची नळजोडणी बंद करण्यात येईल. तसेच अवैध नळजोडणी असलेल्यांनी त्वरित मनपा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून नोंदणी वैध करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून सर्वेक्षण
सध्या मनपाने २५ मिटर रिडर नेमले असून ते शहरात घराघरात जाऊन मिटर रिडिंग घेणे, थकबाकी तपासणे आणि थेट कर वसूल करण्याचे काम करीत आहेत. पाणीपट्टी रक्कम भरल्यानंतर नागरिकांना पावती लगेच दिली जाणार आहे. थकबाकीदार व अनधिकृत नळ धारकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना थकीत भरणा करण्याचे तसेच अवैध जोडणी वैध करण्याचे नोटीस दिल्या जात आहेत.

Akola Municipal Corporation
Dombivli: साहित्य-कलेची पंढरी आता होणार 'क्रीडानगरी'

नागरिकांना पाणीपट्टी कराचा भरणा करणे सोईचे व्हावे याकरिता ऑनलाईन कर भरण्याची (https://amcwaterbill.org) या संकेत स्थळाव्दारे सुविधा देण्यात आली आहे. १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नळजोड धारकांनी आपल्या थकित पाणीपट्टी कराचा भरणा तात्काळ करावा अन्यथा त्यांच्याकडील नळजोडणी खंडीत करण्यात येणार आहे.
- अमोल डोईफोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com