Ajit Pawar
Ajit PawarTendernama

Ajit Pawar : बारामतीतील सेंट्रल पार्कमध्ये उभी राहणार 'ही' नवी वास्तू

Published on

बारामती (Baramati) : प्रशासकीय भवनाशेजारी तयार करण्यात येणाऱ्या नऊ एकर जागेवरील सेंट्रल पार्कमध्ये मनोरा उभारण्यात येणार आहे. याद्वारे बारामतीकरांना उद्यानाचे विहंगम दृश्य पाहता येर्ईल, अशी माहिती माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

Ajit Pawar
Nashik : जलजीवनची चुकीची कामे तपासणीसाठी मंत्रालयातून आले पथक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील जलवाहिनीचे सुशोभिकरण व सेंट्रल पार्क येथील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉल दरम्यान बांधण्यात येणाऱ्या पायऱ्यांवरून पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल अशी रचना असावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

Ajit Pawar
Nashik : पेलिकन पार्कच्या टेंडरमध्ये कमी दराने काम करणारे ठेकेदार केले अपात्र

सेंट्रल पार्कमधील बैठक व्यवस्था, पदपथ, प्रेक्षागृह, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान बालकांसाठी उभारण्यात येणारे पार्क आदी कामे करतांना गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com