Ahilyanagar : आयुक्त डांगेंची आक्रमक कारवाई; पालिकेने का चालविला हातोडा?

Ahmednagar, Ahilyanagar
Ahmednagar, AhilyanagarTendernama
Published on

अहिल्यानगर (Ahilyanagar) : महानगरपालिका प्रशासनाने काटवन खंडोबा रस्त्यावरील पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा टाकला. पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. त्यात रस्त्याच्या कडेला असलेले पक्के अतिक्रमण जेसीबीने पाडण्यात आले.

Ahmednagar, Ahilyanagar
Pimpri : चिंचवडगाव-थेरगावला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण पण ठेकेदाराने...

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, उपअभियंता सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, क्षेत्रिय अधिकारी रिजवान शेख, नितीन इंगळे, राहुल तनपुरे, दत्ता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काटवन खंडोबा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या कामात अतिक्रमणांचा अडथळा आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविले. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagar, Ahilyanagar
MSIDCद्वारे राज्यात 6 हजार किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटची कामे; 37000 कोटींचे बजेट

रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

काटवन खंडोबा रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर झालेला आहे. या रस्त्याचे काम देखील सुरू झाले. परंतु रस्ता रुंदीकरणात काही अतिक्रमणांचा अडथळा आहे. या अतिक्रमणधारकांना महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच नोटिसा बजाविलेल्या आहेत. परंतु नोटिसा मिळूनही संबंधितांनी हे अतिक्रमण काढले नाही.

अखेर महापालिका आयुक्त डांगे यांच्या आदेशाने पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे काटवन खंडोबा रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com