भुयारी मार्गाने करता येणार थेट मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास

दक्षिण मुंबई ते बीकेसी व्हाया एअरपोर्ट भुयारी मेट्रोची चाचपणी
Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai): दक्षिण मुंबई ते बीकेसीत उभारण्यात येणार बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याची चाचपणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएकडून सुरू आहे.

या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे.

Mumbai
शेतकऱ्यांचा विरोध मावळला; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन जोरात

मुंबईत लोकसंख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. काही किलोमीटर अंतर पार करण्यासाठीही तासनतास लागतात. मात्र मुंबईतील जागेच्या कमतरतेमुळं रस्ते रुंदीकरणावर मर्यादा येत आहेत. इतकंच नव्हे तर उन्नत मार्गासाठी पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर मार्ग काढण्यासाठी भुयारी मार्गाची चाचपणी सुरू आहे.

दक्षिण मुंबईपासून थेट बोरीवली आणि पूर्व उपनगरांपर्यंत हे जाळे विस्तारले जाणार आहे. त्यातून मुंबईत एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत थेट भुयारी मार्गातून प्रवास करणे शक्य होणार आहे.

Mumbai
Exclusive: निधी मिळूनही रुग्णालयांतील यांत्रिकी स्वच्छतेला ब्रेक? रुग्णांचे हाल; प्रशासकीय स्तरावर गोंधळ

दरम्यान बुलेट ट्रेन स्थानक सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून बीकेसीपर्यंत जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सध्याचा मार्ग अपुरा पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत जलद प्रवासासाठी पहिल्या टप्प्यात वरळी येथे कोस्टल रोडचा शेवट तेथून पुढे बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा मानस आहे.

पुढील टप्प्यात बीकेसी येथून पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com