सह्याद्री पर्वतरांगा अन् नॅशनल पॉवर ग्रीडचे फडणवीसांनी काय सांगितले कनेक्शन?

Devendra Fadnavis: पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी 8 हजार कोटींचा करार
power grid
power gridTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत (धुळे/नंदुरबार) प्रकल्पासाठी हरियाणा येथील जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला.

राज्य शासनाने उदंचन जलविद्युत प्रकल्पातील गुंतवणूकदारांना जल वापर आणि पर्यावरणीय मंजुरीसह इतर सर्व परवाने जलदगतीने मिळावेत, यासाठी ‘फास्ट-ट्रॅक’ यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

power grid
राज्यातील नव्या पायाभूत प्रकल्पांसाठी फडणवीसांची कंत्राटदारांना डेडलाईन; 2 ते अडीच वर्षात...

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदा, संचालक शुभ नंदा, मुख्य विपणन अधिकारी अनुप भटनागर, उपाध्यक्ष विमल सक्सेना, विधि सल्लागार विकास कुमार पाठक आदी उपस्थित होते. यावेळी दीपक कपूर आणि कंपनीचे अध्यक्ष सुमित नंदा यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऊर्जा ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट्स) धोरणालाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रीड स्थिरतेसाठी सुमारे १ लाख मेगावॅट क्षमतेची उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय वीज ग्रीडही स्थिर ठेवण्याची क्षमता निर्माण होईल.

power grid
साधुग्राम, नमामी गोदा, ओझर विमानतळ... 7 हजार कोटींच्या कामांच्या भूमिपूजनासाठी स्वत: CM फडणवीस येणार

महाराष्ट्र आता सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचत आहे. राज्य सरकारने आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला असून, त्याद्वारे शेती क्षेत्रातील संपूर्ण ऊर्जेची गरज सौरऊर्जेकडे वळविण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रकल्पातून तब्बल 16 गिगावॅट इतकी सौरऊर्जा वितरित क्षमता निर्माण होणार आहे.

या प्रकल्पामुळे शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सौरऊर्जेवर आधारित होणार असून, त्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या सौरऊर्जा आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांमुळे महाराष्ट्र हा देशातील अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रणी ठरणार असून, पर्यावरणस्नेही आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीकडे राज्याची वाटचाल होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविकात आतापर्यंत 50 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार झाले असून सर्व करार प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने करण्यात येत असल्याचे सांगितले. 51 प्रकल्पांद्वारे 70,315 मे.वॅ. वीज निर्मिती अपेक्षित असून त्यामुळे 3.83 लाख कोटी गुंतवणूक व 1,13,990 मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

power grid
राज्याच्या आरोग्य विभागाचे 100 कोटींचे टेंडर पुण्यातील कंपनीच्या खिशात

प्रकल्पाची माहिती...

- या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे २५०० एवढी रोजगार निर्मिती होणार.

- या प्रकल्पाची स्थापित विदयुत क्षमता १५०० मे. वॉ. आहे.

- योजनेसाठी प्रथम पाणीसाठ्याकरिता अंदाजे १९.२९ टीएमसी इतके पाणी आवश्यक असून प्रतिवर्षी पुर्नभरणासाठी ३.२४ टीएमसी पाणी आवश्यक आहे.

- उदंचन योजनांच्या पाण्यापोटी प्रथम भरणासाठी औद्योगिक दराने सुमारे १ ७६२.२१ कोटी व प्रतिवर्ष पुनर्भरणासाठी सुमारे ११२८.३२ कोटी महसूल मिळणे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com