Mumbai

Mumbai

Tendernama

राणी बागेत चार महिन्यांत सहा लाख पर्यटक; अबब! 'इतके' उत्पन्न...

Published on

मुंबई (Mumbai) : भायखळा येथील राणीच्या बागेत १ नोव्हेंबर ते १० मार्च २०२२ या कालावधीत बच्चे कंपनी, महिला, तरुण मंडळी अशा सहा लाख पर्यटकांनी भेट देऊन पेंग्विनसह प्राणी, पक्षी यांचे दर्शन घेतले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी रुपयांची भर पडली आहे.

Mumbai

मोदींनी भूमिपूजन केलेल्या योजनेला ठाकरे सरकारकडून दणका

१ नोव्हेंबर ते १० मार्च या ५ महिन्यांच्या कालावधीपैकी कोविडच्या लाटेचा प्रादुर्भाव वाढलेला असताना म्हणजेच १ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत राणी बाग बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चार महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत अडीच कोटींचे उत्पन्न जमा होणे, ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

Mumbai

पुणे, पिंपरीच्या वाहतूक प्रश्नावर अजितदादांचा रामबाण उपाय

सध्या कोविड संसर्ग नियंत्रणात असल्याने दररोज सहा ते सात हजार पर्यटक तर शनिवार व रविवार या दिवशी किमान २० ते २१ हजार पर्यटक राणीच्या बागेत भेट देऊन पक्षी व प्राणी यांसह पेंग्विन यांना पाहण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

Mumbai

'त्यानंतरच' धारावीच्या पुनर्विकासाचे टेंडर

१ नोव्हेंबर २०२१ ते १० मार्चपर्यंत तब्बल ५ लाख ९४ हजार ३५८ पर्यटकांनी शक्ती, करिश्मा, अस्वल, हरणांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. या पर्यटकांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत २ कोटी ३७ लाख २२ हजार ३५५ रुपयांचे उत्पन्न जमा झाले. यासंदर्भतील माहिती, राणी बाग प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.

Tendernama
www.tendernama.com