Mumbai : वर्सोवा-दहिसर सागरी मार्गासाठी 'या' बलाढ्य 11 कंपन्यांचा प्रतिसाद

MTHL
MTHLTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वर्सोवा ते दहिसर सागरी मार्ग प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून, या टेंडरला ११ कंपन्यांनी प्रतिसाद दर्शविला आहे. यात एल अँड टी, जे कुमार, ट्रान्स रेलसह एचसीसी सारख्या बलाढ्य कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. महापालिकेने वर्सोवा-दहिसर सागरी मार्गाचे काम ६ टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सुमारे १६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

MTHL
पुण्यात 'या' कंपनीचा 4000 कोटींचा प्रकल्प; राज्यात गुंतवणुकीसाठी LG, LOTTE उत्सुक

मुंबईतील वाहतूक कोंडी मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने आणखी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. वर्सोवा ते दहिसर हा तो सागरी किनारा मार्ग आहे. २२ किलोमीटर लांबीच्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गामुळे प्रवास वेगवान होणार आहे. कल्याण, भिवंडीसह मुंबईला मीरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडण्यासाठी मुंबई महापालिका अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. सध्या मरिन ड्राईव्ह ते वरळीदरम्यान सागरी किनारा मार्गाचे काम सुरू असून ते ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबरपासून एक टप्पा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. हा सागरी किनारा मार्ग वांद्रे ते वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. याबरोबरच महापालिकेने दहिसर ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामांसाठीही एल अँण्ड टी कंपनीची निवड केली आहे. सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम चार वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून सिग्नलविरहीत १० मिनिटात प्रवास होणार आहे.

MTHL
Mumbai : नालेसफाईच्या टेंडरमध्ये हेराफेरी करणारा 'तो' ठेकेदार ब्लॅकलिस्टेड

या सर्व मार्गांना नव्याने होणाऱ्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाची जोड मिळणार आहे. वर्सोवा ते दहिसर हा तब्बल १६ हजार कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पाचे काम सहा पॅकेजमध्ये केले जात आहे. पॅकेज ए-वर्सोवा ते बांगूर नगर, पॅकेज बी-बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड आणि जीएमएलआर जोडरस्ता. पॅकेज सी-माईंड स्पेस मालाड ते चारकोप (उत्तरेकडील बोगदा), पॅकेज डी-चारकोप ते माईंडस्पेस मालाड (दक्षिणेकडील बोगदा), पॅकेज ई-चारकोप ते गोराई, पॅकेज एफ-गोराई ते दहिसर या सहा पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

MTHL
Mumbai : स्ट्रीट फर्निचर टेंडर घोटाळ्याप्रश्नी आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना इशारा; नाईलाजाने...

महापालिका मुख्यालयात प्रकल्पासंदर्भात टेंडरमध्ये सहभागी कंपन्यांची बैठक पार पडली. या बैठकीला एल अँड टी, जे कुमार, ट्रान्स रेल, एचसीसी, दिनेश चंद्र अग्रवालसह एकूण ११ कंपन्या सहभागी होत्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंक समुद्र मार्गाचे बांधकाम सुरू आहे. वांद्रे सी-लिंक ते वर्सोवापर्यंत समुद्र मार्ग बांधण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे, तर वर्सोवा ते दहिसरपर्यंत समुद्र मार्ग बांधण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com