Thane News : ठाणेकरांसाठी चांगली बातमी! डम्पिंगसाठी 'ती' 85 एकर जागा मिळणार?

Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationTendernama

Thane News मुंबई : ठाणे शहरात दैनंदिन सुमारे १००० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडी, पडघानजीक सरकारच्या मालकीची ८५ एकर जमीन डम्पिंगसाठी मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने (TMC) राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हा प्रस्ताव मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

ही जागा महापालिकेला मिळाल्यानंतर त्याठिकाणी डम्पिंग उभारण्याचे नियोजन आहे. दरम्यान, दिवा डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिका आचारसंहितेनंतर ८० कोटींचे टेंडर (Tender) काढणार आहे.

Thane Municipal Corporation
Pune News : विद्यार्थ्यांना दिलासा; MPSC ने दूर केला संभ्रम; 2025 पासूनच...

ठाणे शहरात नागरीकरण वाढत असल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून पडले आहे. वाढत्या कचऱ्याची समस्या बिकट झाली असून वारंवार जनजागृती करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिका प्रशासन मेटाकुटीला आले आहे. एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज अंदाजे १००० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असल्याने तसेच डम्पिंग ग्राऊंडची वानवा असल्याने कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चालला आहे.

शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी दिवा, भंडार्ली आणि डायघरच्या जागेचा पर्याय मिळाला. पण गेल्या पाच वर्षांपासून दिवा डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे कागदावरच राहिले आहे. हे डम्पिंग बंद करण्यासाठी तब्बल ८० कोटींचा खर्च अपेक्षित असून आचारसंहितेनंतर या कामासाठी टेंडर काढण्यात येणार आहे.

Thane Municipal Corporation
सरकारच्या नाकावर टिच्चून गावकऱ्यांनी करून दाखवले! येणार तब्बल 6 कोटींचा खर्च

दिवा डम्पिंग बंद करून ठाणे शहरातील सीपी तलाव येथे कचरा डम्प करून त्यानंतर या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा कचरा डायघर या ठिकाणी नेला जातो. मात्र हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसून या ठिकाणीही ५०० ते ६०० टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते. सीपी तलाव येथील कचऱ्याला विरोध होऊ लागल्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी अखेर भिवंडी, पडघ्याजवळील ८५ एकर जागेसाठी ठाणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे शहरात अंदाजे १००० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. यापैकी २०० मेट्रिक टन कचरा राडारोड्याचा आहे. त्यानंतर ४२५ मेट्रिक टन कचरा हा ओला कचरा असून ३७५ मेट्रिक टन कचरा हा सुका कचरा आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com