Tendernama Impact : अ‍ॅम्ब्युलन्स महाघोटाळा... हा तर सरकारी तिजोरीवरील डल्ला!

Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarTendernama

मुंबई (Mumbai) : राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरू केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर आठ हजार कोटींपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा कार्यक्रम राजरोसपणे सुरूच असून, टेंडर थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 'टेंडरनामा'ने अगदी सुरवातीपासून या टेंडरसंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलेली आहेत.

Vijay Wadettiwar
Tender Scam : 'ॲम्ब्युलन्स'मधून निघणार तब्बल 8 हजार कोटींचा महाघोटाळा

वडेट्टीवार म्हणाले, रुग्णवाहिका महाघोटाळा समोर आला आहे. आठ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. सात दिवस शॉर्ट नोटीसवर टेंडर काढले. चार हजार कोटींच्या कामाला आठ हजार कोटी सरकार मोजणार आहे. यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांना काम मिळाले आहे. सरकारमधील काही नेत्यांचे लाड पुरविणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा आटापिटा सरकारनेच केला आहे.

गरीब रुग्णांसाठी असलेल्या या योजनेच्या टेंडरमध्ये आठ हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सरकार अशी कामे करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Vijay Wadettiwar
Tender Scam : आता धीरज कुमारांना 'सुट्टी' नाही! ॲम्ब्युलन्स महाघोटाळा अंगलट येणार?

केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार टेंडरसाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा होऊन कामाचा दर्जा असला पाहिजे. यासाठी टेंडर मुदत किमान 21 दिवसांची असली पाहिजे. जेणेकरून ठेकेदारांना सहभागी होता येईल. मात्र नियमाला केराची टोपली दाखवून हे टेंडर सात दिवसांतच काढण्यात आले. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com