नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक अन् शिवमुद्रा

Atal Setu
Atal SetuTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (Navi Mumbai International Airport) जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडकोमार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले.

Atal Setu
भंडारा ते गडचिरोली सुसाट! नव्या एक्सप्रेस-वेमुळे 23 किमीची बचत

मंत्रालयामध्ये अटलसेतुजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत आयोजित बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडको आणि ‘एमएमआरडीए’चे अधिकारी उपस्थित होते.

Atal Setu
Navi Mumbai: नवी मुंबईतील 11 बिल्डरांना मोठा झटका

शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या सांस्कृतिक वारशाची माहिती सर्वत्र पोहोचविण्यासाठी नियोजन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील, त्यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती होण्यासाठी अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत निधीचा प्रस्ताव तयार करावा.

Atal Setu
नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी, संग्रामपूर येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणार

सिडकोने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून मान्यता घेवून या कामाला गती द्यावी. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी व विभागांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध परवाने त्वरित प्राप्त करुन घ्याव्यात, असे निर्देशही ॲड. शेलार यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com