'समृद्धी'वरील प्रवास आता सुसाट! 'या' जोडीचा मिळणार 'बूस्टर'

Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच या महामार्गाच्या कामाची जबाबदारी होती. खुद्द शिंदे यांनीच बंड केल्यानंतर आणि त्यामुळे सरकार अस्थिर झाल्याने आता या महामार्गाच्या कामाच्या प्रगतीचे काय होणार, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार असून, शिंदे यांनाही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला या जोडगोळीचा बुस्टर मिळणार असून, लवकरच या महामार्गावरून सुसाट प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
रस्ते घोटाळा प्रकरणी क्लिन चिट! बच्चू कडूंना बंडखोरीचे बक्षिस?

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ऐनवेळी घेतला होता. 2 मे रोजी नागपूर ते सेलू बाजार (Nagpur - Selubajar) या 210 किलोमीटरच्या टप्याचे लोकार्पण राज्याचे मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात येणार होते. त्यानंतर हा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार होता.

नागपूर-मुंबई 710 किलोमीटरचा सहा लेन असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी सुरू आहे. त्यातीलच नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्याची पाहणी करून २ मे रोजी लोकार्पणाची घोषणा केली होती.

Devendra Fadnavis Eknath Shinde
ठाकरे सरकारकडून अखेर 'ती' वादग्रस्त भरती रद्द

महामार्गाच्या लगत वन्यप्राण्यांसाठी महामार्गावर अंडरपास आणि ओव्हरपास रस्ते बांधण्यात आले आहेत. दोन्ही मार्गावर जंगलासारखे वातावरण तयार केले असून, वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे.

नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्यात वन्यजीव उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचे आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम अंतिम टप्प्यात असताना त्यातील १०५ पैकी काही आर्च स्ट्रीप्सना अपघातात हानी पोहोचली आहे. तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करून नवीन पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
कात्रज-कोंढवा रोडची कोंडी फोडण्यासाठी हवेत तब्बल 'एवढे' कोटी

वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळवले आहे. या संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
कोरोनाच्या लाटेत घोटाळ्याची भरती; मुदत संपलेल्या औषधांचे...

दरम्यान, आधीच्या नियोजनानुसार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी मार्गाचे लोकार्पण करण्याची राज्य सरकारची इच्छा होती. परंतु विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध केला. त्यांचे म्हणणे काम पूर्ण झाल्यावरच लोकार्पण व्हावे. राज्य सरकार केवळ श्रेय लुटण्यासाठी घाईगडबडीत लोकार्पण करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे एमएसआरडीसीच्या मुंबईत गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बैठकीत प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

Devendra Fadnavis Eknath Shinde
'समृद्धी'च्या उद्घाटनासाठी तारिख पे तारिख; वाहतूक मात्र सुसाट

सूत्रांचे म्हणणे आहे की, नागपूरपासून शिर्डीपर्यंतच्या ५२० किमी महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम २०२१ मध्ये पूर्ण व्हायला हवे होते. परंतु कोविड संक्रमणामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर काम पूर्ण करण्याची कुठलीही डेडलाईन देण्यात आली नाही. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पुलांचे कामही पूर्ण होऊ शकलेले नाही. हे काम पूर्ण होण्यास अजूनही काही महिने लागणार आहेत. दुसरीकडे नागपुरातील शिवमडकापासून १० ते २० किमी अंतरावरील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. हे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर लि. शी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, काम गतीने होत आहे. परंतु ज्या ठिकाणी महामार्गाला वर्धा मार्ग पार करायचा आहे, तेथील काम अजूनही शिल्लक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com