BMC
BMCTendernama

मुंबईतील रस्ते बीएमसी 'असे' करणार चकाचक; टेंडरही निघाले

Published on

मुंबई (Mumbai) : सफाई कामगारांचे आरोग्य, मनुष्यबळाचा कमी वापर, वेळेची व पैशांची बचत यासाठी मुंबईतील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ३५ यांत्रिक झाडू खरेदी करणार आहे. मुंबई महापालिकेने या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

BMC
'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर ठेकदारांचे तोंडच बंद; मंत्र्यांच्या...

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक वाहन वापरावर भर दिला जात असून, आता मुंबईतील रस्त्यांवरील कचऱ्याच्या सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथे यांत्रिक झाडूचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईतील मुख्य रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने करण्यासाठी ३५ यांत्रिक मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी टेंडर मागवण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले. मुंबई शहर व दोन्ही उपनगरात या यांत्रिक झाडूचा वापर सफाईसाठी होणार आहे.

BMC
खड्ड्यांच्या प्रश्नावर आता हायकोर्टात स्वतंत्र खंडपीठात सुनावणी

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात २९ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. मुंबईची स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांचा महत्त्वपूर्ण सहभाग असून, घाणीत काम करत असल्याने कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे कचऱ्याच्या सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, २०३० पर्यंत मुंबई कचरा मुक्तीचे उद्दीष्ट महापालिकेचे आहे.

Tendernama
www.tendernama.com