Mumbai : पनवेल-कर्जत रेल्वे सुसाट; पुढील सव्वादोन वर्षातच...

Railway
RailwayTendernama

मुंबई (Mumbai) : पनवेल-कर्जत या नवीन २९ किलोमीटरच्या मार्गावरील सर्वात लांब बोगद्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याचे २,६२४ मीटरपैकी १ हजार मीटरचे भूमिगत खोदकाम पूर्ण झाले आहे. २०२५ मध्ये मार्गिकेचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे 'मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन'चे उद्धिष्ट आहे. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत या प्रवासात २० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

Railway
Dharavi Redevelopment : हायकोर्टात तारीख पे तारीख; आता 3 ऑक्टोबरची उत्सुकता

पनवेल ते कर्जत एकच रेल्वे मार्ग असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गिकेच्या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. 'मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन'च्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती. कोरोनामुळे या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली. पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला २ हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. या प्रकल्पात नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे बांधले जातील.

Railway
Thane : अखंड विजेसाठी 2 वर्षात 1200 कोटींची कामे

पनवेल-कर्जत यांना जोडणारा सध्या एकेरी मार्ग असून तो पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. नव्या मार्गावर तीन बोगदे असतील. वावर्ले हा बोगदा २,६०० मीटर लांबीचा आहे. नढालची लांबी २१९ मीटर आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे. या बोगद्याव्यतिरिक्त दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून कर्जतजवळील उड्डाणपूल १,२२५ मीटर आणि पनवेललगतचा पूल १,३७५ मीटरचा आहे. २०२५ मध्ये प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com