Ajit Pawar : अजितदादा कडाडले...आश्वासने नकोत, तारीख सांगा!

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

मुंबई (Mumbai) : पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे 962 ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सुध्दा अनेक तक्रारी आहेत, याची चौकशी करून या रस्त्याच्या कामाबाबत नुसते आश्वासन नको तर हे काम नक्की किती तारखेला पूर्ण होणार ती तारीख सांगा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केली.

Ajit Pawar
Good News: 'समृद्धी'चा 85 किमीचा शिर्डी ते इगतपुरी टप्पा पूर्ण

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नारायणपूर आणि केतकावळे येथील प्रतिबालाजी म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मंदिरात दर्शनाला हजारो भाविक येत असतात. तसेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्याला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ हा रस्ता आहे. हा रस्ता नॅशनल हायवे 962 आणि पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडतो.

Ajit Pawar
Nashik: नाशिककरांसाठी गुड न्यूज; 'या' ठिकाणी उभी राहणार फिल्मसिटी

या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सुध्दा अनेक तक्रारी आहेत. या कामाच्या दर्जाची योग्य यंत्रणेकडून चौकशी करावी. तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे, मात्र या रस्त्याच्या कामाचे नुसते आश्वासन नको तर ते काम किती तारखेपर्यंत पूर्ण होणार याची माहिती देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com