मुंबई (Mumbai): समुद्र ही केवळ सीमा नव्हे, तर विकासाची संधी आहे, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सागरी उद्योग व व्यापार क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला, त्याच परंपरेचा वारसा आजचा भारत अधिक सक्षमपणे पुढे नेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को) येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २ लाख २० हजार कोटींच्या “ट्रान्सफॉर्मेटिव्ह इनिशिएटिव्ह फॉर शिपिंग अँड शिपबिल्डिंग”चा शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत जहाजबांधणी, बंदर विकास, किनारी पायाभूत सुविधा आणि हरित सागरी तंत्रज्ञान यांना गती देण्यात येणार आहे.
या प्रसंगी मोदी म्हणाले, “भारताचे सागरी वारसा आणि तांत्रिक कौशल्य जगासाठी दिशा ठरू शकते. ‘ब्लू इकॉनॉमी’द्वारे रोजगारनिर्मिती, निर्यातवृद्धी आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आजचा भारत केवळ समुद्रकिनारी असलेला देश नाही, तर तो सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी जगातील सर्वाधिक आशादायी गंतव्यस्थान बनला आहे.”

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच सागरी उद्योग क्षेत्रातील अग्रणी उद्योजक उपस्थित होते. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ दरम्यान विविध देशांतील प्रतिनिधी, शास्त्रज्ञ आणि गुंतवणूकदार सहभागी होत आहेत. या मंचातून भारताने सागरी क्षेत्रात स्वावलंबन आणि नवोन्मेष यांचा नवा अध्याय सुरू केल्याचे निरीक्षकांचे मत आहे.