पदरमोड न करता मीरा भाईंदर पालिकेने असे उभारले 150 कोटींचे नाट्यगृह

पदरमोड न करता मीरा भाईंदर पालिकेने असे उभारले 150 कोटींचे नाट्यगृह

मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर शहरातील नाट्य रसिकांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, लवकरच नाट्यगृहाच्या उद्घाटनाची घंटा वाजण्याची शक्यता आहे. सुमारे १५० कोटींचा खर्च या नाट्यगृह उभारणीसाठी झाला आहे. महापालिकेने पदरमोड न करता हा संपूर्ण खर्च टीडीआरच्या माध्यमातून विकासकाकडून करून घेण्यात आला आहे.

पदरमोड न करता मीरा भाईंदर पालिकेने असे उभारले 150 कोटींचे नाट्यगृह
लष्कराची मान्यता न मिळाल्याने पुणे-नाशिक हायस्पीडच्या मार्गात बदल

मीरा भाईंदर शहर झपाट्याने वाढत असले तरी शहरात एकही नाट्यगृह नाही. शहरातल्या कलासक्त नागरिकांची नाट्यगृहाची मागणी विचारात घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी काशीमीरा महामार्गालगत असलेल्या सुमारे ५ हजार २५५ चौ.मी.च्या सुविधा भूखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी करत त्याला मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी महापालिकेच्या निधीवर अवलंबून न राहता टीडीआरच्या माध्यमातून विकासकाकडून इमारतीचे बांधकाम करून घेण्यात आले. इमारतीचे बांधकाम झाले पण अंतर्गत फर्निचर, सजावट आदींवर होणारा खर्च सुद्धा शासनाकडून मान्यता घेऊन विकासकाकडूनच टीडीआरच्या माध्यमातून करून घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचा करोडोंचा निधी वाचला आहे.

पदरमोड न करता मीरा भाईंदर पालिकेने असे उभारले 150 कोटींचे नाट्यगृह
'आम्हाला काय कुत्रं चावलं नाही'; ठेकेदारावरून जिल्हाधिकाऱ्यांनी...

तळ अधिक ४ मजल्याच्या इमारतीत १ हजार आसनी व ३०० आसनी अशी २ नाट्यगृहे आहेत. नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम हे १ लाख १० हजार फुटांचे आहे. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तर बेसमेंटमध्ये व तळमजल्यावर पार्किंगची सुविधा आहे. वेटिंग हॉल, कॅफेटेरिया, व्हीआयपी रुम, ग्रीन रुम अशा सुविधा असून, ६ लिफ्ट नाट्यगृहात आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या नाट्यगृहाची ध्वनी यंत्रणा आधुनिक पद्धतीची असून, मुंबईतील मोठ्या कंपनीने साउंड सिस्टीम, प्रकाश व्यवस्था केली आहे. तारांकित हॉटेल सारख्या सुविधा याठिकाणी असून, मीरा भाईंदरसह दहिसर ते विरारपर्यंतच्या नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह पर्वणी ठरणार आहे.

पदरमोड न करता मीरा भाईंदर पालिकेने असे उभारले 150 कोटींचे नाट्यगृह
84 लाख खर्चून उपचार शून्य; नवी मुंबईतील 'हे' कोविड सेंटर रडारवर

सुमारे १५० कोटींचा खर्च या नाट्यगृह उभारणीसाठी झाला आहे. रंगमंच आता नाट्य प्रयोगांसाठी सज्ज झाले आहे. नाट्यकलावंत, नाट्य क्षेत्रातील अनुभवींनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे. शहराला आकर्षक, सुसज्ज नाट्यगृह इमारत मिळाली असून, नागरिकांचे स्वप्न पूर्णत्वास आणू शकलो याचा आनंद मोठा आहे. शासनाने टीडीआरच्या माध्यमातून खर्च करण्यास मंजुरी दिल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com