पवारांच्या निशाण्यावर मोपलवार; 'समृद्धी'तून केली तब्बल ३ हजार कोटींची स्वतःची 'समृद्धी'

Radheshyam Mopalwar
Radheshyam MopalwarTender
Published on

मुंबई (Mumbai) : समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, या महामार्गात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांनी कंत्राटांच्या कामातून ३ हजार कोटी रुपयांची माया जमविल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला. विधानसभा परिसरात ते माध्यमांशी बोलत होती.

Radheshyam Mopalwar
EXCLUSIVE : शिंदे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत? केसरकरांच्या खात्यात कायद्याची ऐसीतैसी!

पवार म्हणाले, ‘‘मोपलवार हे आज देशातील सर्वात श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र, २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर नाममात्र कारवाई करत, पुढे त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाले असली तरीही त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररुमची जबाबदारी दिल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. या अधिकाऱ्याकडे एवढा पैसा असेल तर त्या खात्याच्या प्रमुखाकडे या माध्यमातून काही पैसे आले होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदारांच्या बाजार झाला, तेव्हा ५० खोके या अधिकाऱ्याकडून किंवा समृद्धी महामार्गातून पैसे आले होते का, अशी विचारणा त्यांनी केली.

Radheshyam Mopalwar
Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'त्या' 4,657 कोटींमुळे मुंबई मेट्रो-3 ला मोठा बूस्टर

रोहित पवार म्हणाले, की समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक ११ चे काम ‘गायत्री प्रोजेक्ट’ला २०१८ मध्ये देण्यात आले. हे टेंडर १,९०० कोटी रुपयांचे होते. २०२१ मध्ये ‘गायत्री प्रोजेक्ट’कडून हे काम करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे हे काम हुजूर मल्टीप्रोजेक्टला देण्यात आले. त्यावेळी कामाची रक्कम ८०० कोटींनी वाढवण्यात आली. ही हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनी कोणाची, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या कंपनीचे १ कोटी ५२ लाख समभाग आहेत. यातील २३ लाख समभाग हे मोपलवार कुटुंबीयांकडे आहेत. राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे ३ लाख ९८ हजार समभाग आहेत. तर सदानंद मोपलवार यांच्याकडे २३ हजार ६४५ समभाग आहेत. हुजूर मल्टीप्रोजेक्टचे ४ लाख ९८ हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही तन्वी मोपलवार यांची असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Radheshyam Mopalwar
Vijay Wadettiwar : पुणे रिंग रोड भूसंपादनात ‘मुळशी पॅटर्न’; उच्चस्तरीय चौकशी करा

नेमकी ‘समृद्धी’ कोणाची?

मोपलवार यांची भारतात आणि भारताबाहेर तीन हजार कोटींची मालमत्ता आहे. या महामार्गाची चार महिन्यांत पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यामध्ये दरवाढीस मंजुरी देण्यात आली. परिणामी निविदा ५४ हजार कोटींवर गेली. त्यामुळे ‘समृद्धी‘ सामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची झाली, हे कळून येत असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला.

मोपलवार कुटुंबीयांची तीन हजार कोटींची मालमत्ता

राधेश्याम मोपलवार यांच्याकडे १,५०० कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडे १५० कोटी, तिसऱ्या पत्नीकडे ३०० कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या पहिल्या मुलीकडे ५०० कोटी व दुसऱ्या मुलीकडे ३५० कोटी रुपये आणि त्यांचा भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे २०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. हा एकत्रित आकडा तीन हजार कोटींच्या घरात असल्याचे पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com