Nashik: नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे वळण योजनेसाठी 49 कोटी

या प्रकल्पामुळे १६५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
irrigation, water conservation, river
irrigation, water conservation, riverTendernama
Published on

मुंबई (Nashik): नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे १६५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

irrigation, water conservation, river
Nashik: नाशिक शहरातील 1100 कोटींच्या प्रकल्पांना चालना; केंद्र सरकारकडून 272 कोटी मंजूर

अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजना दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या नाल्यावर प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे ३२.०४ दशलक्ष घन फूट पाणी उपलब्ध होणार आहे.

यापैकी ४.८३ दशलक्ष घ. फू. पाणी साठा स्थानिक वापरासाठी तर २७.२१ द.ल.घ. फू. पाणी साठा गोदावरी खोऱ्यात प्रवाही पध्दतीने वळविण्याचे नियोजन आहे. ४९.२६ कोटी पैकी ४६ कोटी रुपये प्रत्यक्ष कामासाठी तर ३.२६ कोटी रुपये अनुषांगिक कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

irrigation, water conservation, river
नार-पार-गिरणा प्रकल्प: 4,116 कोटींचे टेंडर फायनल; मेघा इंजिनिअरिंग - आयसीसी इन्फ्राला कार्यारंभ आदेश

प्रकल्पास युनिक पायाभूत आयडी देण्याची कार्यवाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने करावयाची आहे. कामास दिलेल्या मान्यतेपैकी भूसंपादनासाठी १३.४६ कोटी, कामांसाठी २४.३३ कोटी, पुलासाठी ३.९० कोटी, इमारतीसाठी ३२ लाख, दळणवळणासाठी ३.७० कोटी, वृक्षारोपणासाठी १५ लाख, देखभालीसाठी १२ लाख आणि संकीर्ण १.७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Tendernama
www.tendernama.com