Mumbai: 'त्या' नवीन रेल्वे टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरू

Jogeshwari Railway Terminal: जोगेश्वरी टर्मिनल चालू वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता
रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
Indian RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai): लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी पश्चिम रेल्वेने सातवे टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला.

रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
Tent City Nashik: सिंहस्थासाठी 'या' 4 ठिकाणी उभारणार टेंटसिटी

जोगेश्वरी येथे हे नवीन टर्मिनल उभारण्यात येत आहे. या नवीन टर्मिनलच्या कव्हर शेडचे बांधकाम, सेवा इमारत, प्लॅटफॉर्मचे काम आणि स्टेशन इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्यानंतर ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होईल. 76.87 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. जोगेश्वरी टर्मिनल या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.

मुंबईत सध्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला टर्मिनलमधून लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. आता या टर्मिनलला आणखी एक नवे पर्यायी टर्मिनल मिळणार आहे. या टर्मिनलवर दररोज 12 जोड्या मेल/एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जातील, ज्यामध्ये दिल्ली आणि उत्तर भारताला जाणाऱ्या रेल्वेंचा समावेश आहे.

रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
Nashik: सिंहस्थ कामांसाठी 650 हेक्टर भूसंपादनाचे प्रशासनासमोर आव्हान

अमृत भारत स्टेशन विकास योजनेचा भाग म्हणून पश्चिम रेल्वे जोगेश्वरीमध्ये एक नवीन टर्मिनल बांधत आहे. नवीन टर्मिनलमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेची संख्या वाढण्यास मदत होईल. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जमिनीवर हे नवीन रेल्वे टर्मिनस बांधले जात आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी जोगेश्वरी टर्मिनल सोईस्कर पर्याय ठरणार आहे.

या नवीन टर्मिनलच्या कव्हर शेडचे बांधकाम, सेवा इमारत, प्लॅटफॉर्मचे काम आणि स्टेशन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यानंतर ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होईल. 76.87 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. पश्चिम रेल्वेवरील हे नवीन टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर, नागरिकांना लांब पल्ल्याच्या रेल्वे पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, बोरिवली किंवा अंधेरी स्थानकांवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
Good News! तब्बल तेराशे कोटी; 4 वर्षे अन् मुंबईकरांची कटकट संपणार

या नवीन टर्मिनलवर प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. जोगेश्वरी टर्मिनलच्या पहिल्या टप्प्यासाठी 51 कोटींची निविदा मागवण्यात आली होती, ज्यामध्ये दोन प्लॅटफॉर्म आणि तीन लाईन बांधण्याचा समावेश होता. तथापि, प्रकल्पातील विलंब आणि इतर कारणांमुळे बजेट 76 कोटींवर पोहोचले आहे.

या टर्मिनलवर 24 कोच असलेल्या रेल्वे थांबू शकतात. दुसऱ्या टप्प्याचे काम देखील सुरू झाले आहे. या टप्प्यात नवीन आयलंड प्लॅटफॉर्म (दोन्ही बाजूंनी रेल्वे ट्रॅकसह), पिट लाइन आणि शंटिंग नेक बांधणे समाविष्ट आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com