Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; 110 वर्षे जुना 'तो' पूल होणार जमीनदोस्त; मुहूर्तही ठरला

Sion Road Bridge
Sion Road BridgeTendernama

मुंबई (Mumbai) : तब्बल 110 वर्षांहून अधिक जुना ब्रिटीशकालीन सायन रोड ओव्हर ब्रीज (Sion Road Overbridged) येत्या गुरुवार (ता. 28) रात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. लवकरच मध्य रेल्वे (Central Railway) हा जुना पूल पाडण्याचे काम सुरू करणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षात याठिकाणी नव्या सायन ओव्हर ब्रीजचे काम पूर्ण केले जाणार आहे.

Sion Road Bridge
Nashik : ड्रायपोर्टच्या रस्त्यासाठी भूसंपादनाचे दर जाहीर; हेक्टरी 70 लाख ते 1 कोटी रुपये देणार

गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या पुलांची रेल्वे, मुंबई महापालिका आणि आयआयटी, मुंबई यांनी संयुक्त तपासणी केली होती. त्यानंतर धोकादायक पूल आणि सर्व ब्रिटिशकालीन पूल नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेलाही कुर्ला ते परळपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका बांधायची असून, त्यात या पुलामुळे अडथळे निर्माण होत आहेत. अशा स्थितीत हा पूल पाडून पुनर्बांधणी केल्यानंतर सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.

सध्या सायनचा हा पूल 4 लेनचा असून तो 6 लेनचा करण्यात येणार आहे. सध्या हा पूल दोन स्पॅनचा असून त्यातील एक भाग 15 मीटर रुंद आणि दुसरा भाग 17 मीटर रुंद आहे. नव्या पुलावर एकच स्पॅन असेल, मात्र तो 51 मीटर रुंद करण्यात येणार आहे. पुलाची रुंदी वाढवल्यानंतर सध्याच्या ट्रॅकच्या पश्चिम टोकाला आणखी दोन ट्रॅक टाकता येतील. त्यामुळे कुर्ला ते परळपर्यंत पाचव्या-सहाव्या लाईनचे बांधकाम शक्य होणार आहे.

Sion Road Bridge
Gunthevari Act : गुंठेवारीबाबत महसूलचा मोठा निर्णय; 5 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार का?

सायनमधील रेल्वे रुळ आजूबाजूच्या भागापेक्षा छोटे आहेत. बशीसारखा आकार असल्याने मुसळधार पाऊस पडतो तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील पावसाचे पाणी सायनमधील रेल्वे रुळांवर साचते. ही समस्या टाळण्यासाठी रेल्वेने अनेक पावले उचलली आहेत. ट्रॅकची उंची वाढवणे हे एक काम आहे, परंतु सध्याच्या आरओबीची उंची केवळ 5.1 मीटर असल्याने ट्रॅकची उंची वाढवणे आता शक्य नाही. नवीन पूल 5.4 मीटर उंच असेल. अतिरिक्त उंचीमुळे ट्रॅक वाढवणे शक्य होणार आहे.

हा पूल बंद करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते, मात्र स्थानिकांचा विरोध आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर हा पूल काही काळ सुरू ठेवण्यात आला होता. सायनमध्ये महाविद्यालये आणि शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पूल तोडल्यास प्रवास करताना अडचणी निर्माण होतील, त्यामुळे इथल्या स्थानिकांचा हा पूल पाडण्यास विरोध होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com