BMC: मुंबईतील सीसी रस्ते कामांचे IIT कडून थर्ड पार्टी ऑडिट

रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होणार
BMC
BMC Tendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबईतील महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प नियोजनानुसार सुरू असून मे २०२७ पर्यंत मुंबईतील मुंबईतील सीसी रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

BMC
Mumbai: मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी लवकरच 380 कोटींचे लवकरच टेंडर

मुंबईतील एकूण रस्त्यांचे जाळे सुमारे २,०५० किमी आहे. त्यापैकी २०२२ पूर्वीच सुमारे १,२०० किमी रस्ते सिमेंट काँक्रिट (CC) मध्ये रूपांतरित करण्यात आले होते. २०२२ नंतर आणखी ६७७ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून त्यापैकी सुमारे ७१% म्हणजेच ४८१ किमी काम पूर्ण झाले आहे.

हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. पहिला टप्पा ३०७ किमीचा असून तो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला, तर दुसरा टप्पा ३७० किमीचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला.

उर्वरित कामांपैकी १०–१५% काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर आणखी १०% काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे १,९०० किमी रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यात आलेले असतील.

BMC
Pune Ring Road: रिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण होणार

कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आयआयटीची थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आयआयटी दुसऱ्या टप्प्याचे ऑडिट करत असून आता पहिल्या टप्प्याचेही ऑडिट करण्यात येणार आहे.

सीसी रस्ते कामांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने घट होत आहे. २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४–२५ मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३% घट झाली. २०२५–२६ मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३% घट झाली. चालू वर्षासाठी खड्डे दुरुस्तीचा टेंडर खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित आहे, म्हणजेच आणखी ५०% घट होईल, असे अपेक्षित आहे.

महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत सीसी रस्ते कामांविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमदार अमीत साटम यांनी मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामांविषयी माहिती दिली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com