मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तब्बल 32 तास 'जॅम' झाल्याच्या घटनेतून सरकार धडा घेणार का?

वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
Mumbai Pune Expressway, Traffic
Mumbai Pune Expressway, TrafficTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कित्येक तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक, तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

Mumbai Pune Expressway, Traffic
Nashik: 'स्मार्ट सिटी' अ‍ॅक्शन मोडवर! आणखी 28 सिग्नल, 90 मेसेज डिस्प्लेसाठी काढले 105 कोटींचे टेंडर

पालकमंत्री ॲड. शेलार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात, अशा महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते, असे नमूद करुन विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे या बाबी महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे.

Mumbai Pune Expressway, Traffic
Nashik: नाशिकमधील 'त्या' सरकारी कार्यालयांसह उपजिल्हा रुग्णालयाचे होणार स्थलांतर

या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारणी, हेलिपॅडसाठी आवश्यक जागा यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे. हेलिपॅड उभारणीद्वारे कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने रुग्णलयात हलविणे.

आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड. शेलार यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com