भविष्यातील मुंबईचा वायू वेगाने प्रवास! दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रोवर मोहर

तब्बल २३ हजार कोटींचे बजेट; मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय
राज्य सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis, Maharashtra Government, MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारची मोठी घोषणा
कोपरगाव-मालेगाव मार्गावर येवल्यात उड्डाणपूल नको; बायपास करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेतील एक मार्गिका म्हणजे मेट्रो ८ मार्गिका आहे. या मार्गिकेमुळे मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटात पार करता येणार आहे. अंदाजे २३ हजार कोटी रुपयांची ही मार्गिका ३५ किमी लांबीची आहे. ही मार्गिका मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन महानगरातून जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेचे बांधकाम सिडको आणि एमएमआरडीएकडून केले जाणार होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - मानखुर्द दरम्यानच्या १०.१ किमी लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम एमएमआरडीएकडून केले जाणार होते. तर उर्वरित मार्गिकेची उभारणी सिडकोकडून केली जाणार आहे.

या निर्णयानुसार एमएमआरडीएने आणि सिडकोने आराखडा तयार केला होता. असे असताना राज्य सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये ही मार्गिका सार्वजनिक - खासगी सहभागातून उभारण्याचा निर्णय घेऊन याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Nashik: द्वारका चौकातील वाहतूक 3 महिने राहणार बंद; काय आहे कारण?

प्रकल्पाच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सिडकोवर टाकली आहे. ही जबाबदारी आल्यानंतर सिडकोने मेट्रो ८ मार्गिकेच्या आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबर २०२५ मध्ये या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविल्या. सिडकोकडून नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

मोनार्क सर्वेयर्स, निप्पाॅन केओईआय, आरआयटीईएस, टाटा कन्स्लटिंग इंजिनीअर्स आणि क्रिसिल या पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या निविदांची छाननी करून लवकरच आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार असून त्यानंतर सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त सल्लागाराने आराखड्याचे पुनरावलोकन केल्यानंतर तो अंतिम करून पुढे मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Nashik: महामेट्रोच्या सर्वेक्षणात नाशिक शहर मेट्रोसाठी पात्र; निओ मेट्रो बासनात

निविदा प्रक्रिया अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती करत त्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे काम सुरू होण्यासाठी आणि त्यानंतर मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ प्रवास मेट्रोद्वारे ३० मिनिटांत करण्यासाठीही काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होण्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Mumbai: 10 लाख मुंबईकरांसाठी सरकारने दिली गुड न्यूज!

बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले. 

मेट्रो ८ प्रकल्पाविषयी...

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता.

  • मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत.  

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.

  • घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.

  • 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com