फुसका बार; अपेक्षा 1 हजार कोटींची मिळणार 577 कोटी

Railway

Railway

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी मुंबईकरांची घोर निराशा केली आहे. मुंबई महानगर प्रकल्पांसाठी आणि उपनगरीय रेल्वेसाठी किरकोळ तरतूद केली आहे. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांवर तुंटपुंजा निधी देऊन मुंबईकरांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. एमआरव्हीसीला अर्थसंकल्पातून 1 हजार कोटींची अपेक्षा होती. मात्र, मिळाले फक्त 577.5 कोटी.

Railway

पुण्यातील नदीपात्रातील रस्ता होणार बंद; भिडे पूलही पाडणार कारण...

लाखो रेल्वे प्रवाशांचा रोजचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. यातील अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव घोषणा होईल. त्यानंतर सुखकर प्रवास होईल, असे स्वप्नाचे इमले प्रवाशांकडून तयार करण्यात आले होते. मात्र, बुधवारी रोजी जाहीर झालेल्या पिंक बुकमधून मुंबई महानगरातील रेल्वेच्या विकासासाठी किरकोळ निधी देण्यात आला. एमयूटीपीच्या प्रकल्पांसाठी 577.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही 2021-22 च्या अर्थसंकल्पात 650 कोटींची तरतूद होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात 72.5 कोटी रुपयांची तरतूद कमी केली आहे.

Railway

Exclusive ठग्ज ऑफ पुणे; अधिकारी, बोगस लाभार्थ्यांचे भूसंपादन रॅकेट

एमयूटीपी 2 साठी 185 कोटी, एमयूटीपी 3 साठी 190 कोटी आणि एमयूटीपी 3 अ साठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल-अंधेरी मार्गावरील 9 डब्यांचे रुपांतर 12 डब्यांच्या लोकलमध्ये करण्याच्या कामासाठी, शिल्लक असलेल्या कामासाठी 2.5 कोटी देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार एमयूटीपी प्रकल्पासाठी 50 टक्के आर्थिक तरतूद करते.

Railway

मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरील जुन्या पुलांची दुरुस्ती लवकरच

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांनी खूप अपेक्षा ठेवली. कोरोना काळात 650 कोटीपर्यंत तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदा 577.5 कोटींची तरतूद केल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग सारख्या अनेक प्रकल्प मार्गी लागणे कठीण होऊन बसले आहे.

Railway

मुंबई उपनगरात चार थीम पार्क साकारणार; २५ कोटींचे टेंडर

यंदाच्या अर्थसंकल्पात 577.5 कोटी
एमयुटीपी 2 - 185 कोटी
प्रकल्प-ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका, सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका

एमयुटीपी 3 - 190 कोटी
विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, 47 वातानुकूलित लोकल गाड्या, रुळ ओलांडण्याचे प्रकार

एमयुटीपी 3 ए - 200 कोटी
सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, 210 वातानुकूलित लोकल गाड्या, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा

Railway

सातारा मेडिकल कॉलेज : टेंडर प्रक्रियेत कोणते नेते शर्यतीत?

रेल्वेसाठी आणि विशेषत: मुंबईकरांसाठी हा प्रगतीशील अर्थसंकल्प आहे. एमआरव्हीसीला विविध एमयूटीपी कामांसाठी 577.5 कोटी रुपये देण्यात आले आहे. यामध्ये केंद्र आणि राज्याला 50 टक्के द्यावे लागतील. त्यामुळे एकूण 1 हजार 155 कोटी मिळणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी एमआरव्हीसीद्वारे वर्षभरात नियोजित चालू असलेल्या कामांना आणि नवीन कामांना चालना मिळेल. प्रवासी येत्या काही दिवसांत विकासात्मक कामांची अपेक्षा करु शकतात.
- रवी अग्रवाल, मुख्य व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष, एमआरव्हीसी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com