बीएमसीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; 'तो' जलबोगदा दहा महिन्यातच पूर्ण

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे काम नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच म्हणजे अवघ्या १० महिन्यांमध्ये पूर्ण करुन मुंबई महापालिकेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी नोंदवली आहे. या ९.८ किलोमीटर लांब अंतराचअंतराच्या भूमिगत जलबोगद्याचे आतापर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत म्हणजेच एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.

BMC
बुलेट ट्रेन शेअर खरेदीला मुहूर्त; महाराष्ट्र सरकारचे ६ कोटी

मुंबई शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी सुमारे ९.८ किलोमीटर लांब अंतराचा भूमिगत जलबोगदा प्रकल्पांतर्गत अमरमहाल ते वडाळा आणि वडाळा ते परळ अशा दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे. अमरमहाल ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे काम नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमरमहल ते वडाळा व पुढे वडाळा ते परळ हा एकूण ९.८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा बांधण्याचा प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. जल बोगदा खनन करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) देखील कार्यरत आहे. प्रकल्पातील दोन बोगद्यांपैकी पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान (अमरमहाल) ते प्रतीक्षा नगर (वडाळा) दरम्यानच्या सुमारे ४.३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खनन दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु करण्यात आले होते. सुमारे १४ महिने कालावधीत म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. सुमारे १४ महिने अंदाजित कालावधीच्या तुलनेत ४ महिने आधीच म्हणजे अवघ्या दहा महिन्याच्या विक्रमी कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे. यामुळे प्रकल्पाचा वेग वाढणार आहे.

BMC
मुंबई मेट्रो-३ : पहिली ८ डब्यांची प्रोटोटाईप ट्रेन यशस्वी

पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होवून टीबीएम मशीन बाहेर पडले आहे. दरम्यान वडाळा ते परळ या दुसऱ्या टप्प्यातील भूमिगत जलबोगद्याचे कामही दीड महिन्यानंतर सुरु होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करुन बाहेर पडलेले बोगदा खनन संयंत्र सुमारे ८ अंशात फिरवून दुसऱ्या टप्प्यातील कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. अमरमहाल ते परळ या प्रकल्पाचे आतापर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजित वेळेत म्हणजेच एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा महानगरपालिका प्रशासनाला आहे. या जलबोगद्याद्वारे एफ/उत्तर, एफ/दक्षिण त्याचप्रमाणे ई आणि एल विभागातील काही परिसरातील नागरिकांना सन २०६१ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. मुंबई शहर तसेच पूर्व उपनगरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे पाणी पुरवठ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com