मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना स्वच्छतागृहांची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने 14 इंस्पिरेशनल शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी) निधी दिला जाणार असून 35 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
चार शौचालयांपाठोपात आता आणखी नऊ शौचालयांच्या बांधकामासाठी लवकरच टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. ही शौचालये वातानुकूलितसह विविध सुविधांयुक्त असणार आहेत. मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देशविदेशातील पर्यटक भेटी देतात. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शौचालयांची सुविधा नसल्याने पर्यटकांची विशेषतः महिलांना गैरसोयींना सामोरे जावे लागते.
मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना केली होती. एकूण 14 शौचालये बांधण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या आधी चार ठिकाणी शौचालय बांधकामासाठी टेंडर काढण्यात आली आहेत. लायन गेट 17, विधानभवन 20, उच्च न्यायालयासमोर 26, फॅशन स्ट्रीट 14, गिरगाव दर्शक गॅलरी 20, बाणगंगा 14, राणीबागेजवळ 20, हायवे अपार्टमेंट, शीव 20, हाजी अली जंक्शन 16, सिद्धिविनायक मंदिर परिसर 20, वरळी सी लिंक मार्ग 16, माहीम रेती बंदर 14, धारावी 60 फीट रोड 18 याठिकाणी ही शौचकूप बांधण्यात येणार आहेत.