'त्या' परिसराच्या पूरमुक्तीसाठी बीएमसीचे टेंडर; ९० कोटींचे बजेट

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सब-वे, जे. पी. रोड, वीरा देसाई मार्ग आणि आझाद नगर परिसराच्या पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिका मोगरा नाल्याचे रुंदीकरण करणार असून आवश्यक ठिकाणी नवीन पर्जन्य जलवाहिन्याही टाकल्या जाणार आहेत. या कामांसाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरु केली असून प्रशासनाने त्यासाठी सुमारे ९० कोटींचे बजेट निश्चित केले आहे.

BMC
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींबाबत गडकरींची मोठी घोषणा; 2023मध्ये...

मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, असलेल्या वाहिन्यांचे रुंदीकरण, भूमिगत टाक्या आणि नाल्यांचे रुंदीकरण अशा अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचे सकारात्मक परिणाम या वर्षीपासूनच दिसायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अंधेरी सब वेमध्ये पावसाळ्यात दरवर्षी एस. व्ही. रोडवरील वाहतूक बंद करावी लागते. वीरा देसाई मार्ग व अन्य भागांतही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. या वर्षीदेखील पावसात अंधेरी सब वेमध्ये चार वेळा पाणी तुंबले होते. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

BMC
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; पाहणीसाठी खुद्द रेल्वेमंत्री 'बीकेसी'त

अंधेरी सब-वेमध्ये साचणारे पाणी लक्षात घेऊन महापालिकेच्यावतीने अंधेरी पूर्वेकडून एस. व्ही. रोड, वीरा देसाईमार्गे समुद्राकडे जाणाऱ्या मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे, तर वीरा देसाई मार्ग आणि जे. पी. रोडवर अतिरिक्त पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. महापालिकेने यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू केली असून या महिन्यात कामही सुरू होण्याची शक्यता आहे. या कामांमुळे अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सब-वे, जे. पी. रोड, वीरा देसाई मार्ग आणि आझाद नगर परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार असल्याचे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मिस्त्री यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com