Mumbai : खड्डे आणि रस्त्यांच्या डागडुजीचे 50 कोटींचे टेंडर

road
roadTendernama

मुंबई (Mumbai) : शहरातील रस्त्यांचे सिमेंट-काँक्रीटीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेला कंत्राटदार मिळत नसल्यामुळे खड्डे भरणे आणि रस्त्यांच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. याअंतर्गत वांद्रे ते गोरेगावपर्यंतच्या कामासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर रस्ते आणि खडे भरण्याचे काम केले जाणार आहे.

road
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे आणखी सुसाट; 4 महिन्यांतच Missing Link मोहीम फत्ते!

मुंबईतील रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे टेंडर देण्यात आले आहे, मात्र मुंबईत 397 किमी अंतरातील 910 रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत 123 कामे सुरू झाली आहेत. उर्वरित 787 कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. यातील फक्त 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतीपथावर आहेत. यातच पावसाळा सुरू होण्यास अवघे काही महिने शिल्लक राहिले असल्यामुळे महापालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत आहे.

road
Mumbai : 'मेट्रो-3'चा अटकेपार झेंडा; 'वर्ल्ड टनेल काँग्रेस 2024' मध्ये केस स्टडीज सादर

यामध्ये सर्वाधिक टीका होणारे खड्डे बुजवण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम उपनगरांतील झोन-3 मधील एच पूर्व, एच पश्चिम वांद्रे आणि के पूर्व अंधेरी वॉर्डामध्ये म्हणजे वांद्रे ते मालाड-गोरेगावपर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे, बॅडपॅच भरण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामावर सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर रस्ते आणि खडे भरण्याचे काम यातून केले जाणार आहे. मास्टिक अस्फाल्टने हे काम केले जाणार असून यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com