Mumbai : रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी लवकरच आणखी एक बिग बजेट टेंडर

Road
RoadTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील चारशे किलोमीटर रस्त्यांच्या कामांसाठी आणखी एक बिग बजेट टेंडर काढण्याची तयारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरु केली आहे. येत्या तीन आठवड्यात हे सात हजार कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी उर्वरित रस्ते कामांचे भूमिपूजन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

Road
Mumbai : रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडणार; 'ते' 1362 कोटींचे टेंडरही रद्द

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने याआधी ६,०७८ कोटींच्या कामांसाठी टेंडर मागवले. जानेवारी २०२३ मध्ये ५ बड्या कंत्राटदारांना या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. ही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यातच शहर भागातील रस्ते कंत्राटदाराने एकही काम सुरू न केल्यामुळे त्याचे टेंडर रद्द करण्यात आले व हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. अशा स्थितीत महानगरपालिकेने आता आणखी ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी टेंडर काढण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या तीन आठवड्यात टेंडर काढण्यात येणार आहे.

Road
Mumbai : पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी गुड न्यूज; 'त्या' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 503 कोटींचे टेंडर

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे महापालिकेने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण केले जात होते. मुंबईत एकूण सुमारे २००० किमीचे रस्ते असून त्यापैकी पन्नास टक्के रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात महापालिकेने २३६ किमीची २२०० कोटींची कामे हाती घेतली. महापालिकेची मुदत संपण्याआधी या कामांना मंजूरी देण्यात आली. ही कामे ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली. ती कामे अद्यापही सुरू आहेत. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या कामांसाठी ६,०७८ कोटींचे प्रथमच बिग बजेट टेंडर काढण्यात आले होते. मात्र वर्ष संपत आले तरी ही कामे सुरूच न झाल्यामुळे मोठा वाद झाला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com