कम्युनिटी हॉस्पिटलसाठी बीएमसीचे ११ कोटींचे बजेट; 20 रुग्णालये...

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईत झोपडपट्टी आणि रुग्णालयांपासून दूर असलेल्या भागात आरोग्य सेवा देण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) बाळासाहेब ठाकरे कम्युनिटी हॉस्पिटल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुंबई शहरात 20, पूर्व उपनगरात 20 आणि पश्चिम उपनगरात 20 अशी एकूण 60 रुग्णालये सुरु करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरात 20 रुग्णालये उघडली जातील, ज्याला महापालिका आयुक्त आयएस चहल यांनी मंजुरी दिली असून त्यासाठी महापालिका 11 कोटी खर्च करणार आहे.

BMC
वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलवसुलीचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात

यासाठी 5 जुलै 2022 रोजी टेंडर जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये 6 कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी एकाला टटेंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटदार हॉस्पिटलमध्ये पोर्टेबल केबिन, आवश्यक सुविधा, सेफ्टी चेन, टेबल, खुर्ची आदी सुविधा पुरवणार आहे. मुंबईतील बहुतांश झोपडपट्टी भागात रुग्णालये नसल्याने तेथील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या भागात आरोग्य सेवांची गरज आहे. तसेच येथील बहुतांश नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने तेथे रुग्णालय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर मोठ्या रुग्णालयांवरील रुग्णांचा ताणही कमी होईल.

BMC
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर २४ तासात प्रक्रिया;बुलेट ट्रेनसाठी

रक्ताचे नमुने गोळा करणे, एक्स-रे यांसह काही महत्त्वाच्या चाचण्या येथे उपलब्ध असतील. रुग्णालयांमध्ये अधिक चाचण्या आणि धावपळ कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच नागरिकांना खासगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागणार नाहीत. सर्वसामान्य नागरिक, ताप व इतर आजारांचे रुग्ण दररोज हॉस्पिटलच्या फेऱ्या मारतात, त्यांच्यावरही येथे उपचार होऊ शकतात. झोपडपट्टी भागात असे दिसून आले आहे की लोक आजारी पडल्यावर छोट्या दवाखान्यात जातात. जिथे डॉक्टर त्यांना महागड्या चाचण्या आणि औषधे लिहून देतात. यामुळे गरीब लोक उपचार अर्धवट सोडून देतात, जो नंतर गंभीर आजाराचे रूप घेतो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com