Mumbai : कुलाब्यातील 'या' प्रकल्पासाठी सल्लागार; 232 कोटींचे टेंडर

मलजलाचे पुनर्वापर व पुन:श्चक्रिकरणामुळे पर्यायी पाणीपुरवठा करणे शक्य
BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापलिकेच्या (Mumbai Municipal Corporation) हद्दीतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी व पुरवठा यातील तुटवडा कमी करण्यासाठी अपारंपारिक स्त्रोतांचे शोध घेण्यात येत आहेत. मलजलाचे पुनर्वापर व पुन:श्चक्रिकरणामुळे पर्यायी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. यासाठी कुलाबा मलनि:सारण केंद्रातील मलजलाचे पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरीत करण्याचा प्रतिदिन १२ दशलक्ष लिटर क्षमतेचा 'आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया प्रकल्प करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. महापालिकेने या कामासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली असून त्यासाठी २३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

BMC
Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबईत येणार, कारण...

मुंबईला पाणीपुरवठा करण्यापूर्वी भांडूप संकुल येथे जलशुद्धीकरण केले जाते. त्यानंतर ते पाणी नागरिकांना पाठवले जाते. भांडूप येथे १९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची उभारणी ४४ वर्षापूर्वी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण प्रकल्प संरचनात्मक दृष्ट्या कमकुवत झाला असून त्याचे आयुर्मान संपुष्टात येत आहे. भविष्याचा विचार करता नवीन जलशुध्दीकरण प्रकल्पाची नितांत आवश्यकता असल्याने प्रतिदिन २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. तोपर्यंत जुना १९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प कार्यरत राहील. या कामाच्या टेंडर प्रक्रियेचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी १,३५० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

BMC
Bullet Train : 21 किलोमीटरच्या बोगद्यासाठी टेक्निकल टेंडर प्रसिद्ध

मुंबईकरांना १०० किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या धरणातून पाणी येते. धरणातील पाणी मुंबईत भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते त्यानंतर ते विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांमध्ये साठवले जाते. तेथून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. ट्रॉम्बे निम्नस्तर व उच्चस्तर जलाशय आणि भांडूप व येवई महासंतुलन जलाशयाच्या दुरुस्तीच्या एका कप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या कप्प्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पवई उच्चस्तर व निम्नस्तर जलाशय व घाटकोपर निम्नस्तर जलाशयाच्या दुरुस्तीसाठीच्या टेंडर प्रक्रिया प्रगतीपथावर आहेत. मलबार टेकडी जलाशयाच्या पुर्नबांधणीच्या कामास या वर्षात सुरुवात झाली आहे. तसेच भंडारवाडा टेकडी, गोलाजी टेकडी, बीयूडीपी येथील जलाशयांच्या प्राथमिक अभियांत्रिकी कामे प्रगती पथावर आहेत, यासाठी महापालिका ११९ कोटी रुपये इतका खर्च करणार आहे.

BMC
Mumbai : मुंबई-ठाण्याला जोडणारा मार्ग खुला; 'या' पुलाचे लोकार्पण

बाळकुम ते सॅडल टनेलपर्यंत ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम तसेच चिंचवली ते येवई दरम्यान ३००० मिलीमीटर व्यासाची मध्य वैतरणा (मिसिंग लिंक) मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम ऑगस्ट २०२२ व जून २०२२ मध्ये पूर्ण झालेले आहे. भांडूप संकुल येथे जलबोगद्यापासून जलप्रक्रिया केंद्रापर्यंत ४००० मिलीमीटर व्यासाच्या अंतर्गत जलवाहिनी जोडनीचे काम पूर्ण झाले आहे. तानसा (पूर्व) आणि (पश्चिम) येथील भांडूप अॅकर ब्लॉक ते मरोशी गेट टप्पा-दोन दरम्यान अस्तिवात असलेली १८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी बदलून २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मरोशी ते सहार गाव दरम्यान जूनी १४५० मिलीमीटर व्यासाच्या जूनी जलवाहिनी बदलून २००० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. यासाठी १३६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबईमधील विहार धरणाचे ओसंडून वाहणारे पाणी भांडूप संकुल जल शुद्धीकरण केंद्रावर नेण्यासाठी टेंडर मागविण्यात येणार आहेत.

BMC
Mumbai : ब्रिटीशकालीन 3 पुलांवर लवकरच महापालिकेचा हातोडा

मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करून मागणी आणि पुरवठा यामधील तूट कमी करण्याकरिता विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे २०० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नि:क्षारीकरण प्रकल्प ४०० द.ल.लि. प्रतिदिनपर्यंत विस्तारित क्षमतेसह बांधण्याचे प्रस्ताविले आहे. याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण केले असून अहवालाची तपासणी सल्लागारामार्फत करण्यात आली आहे. टेंडर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रकल्पाच्या विकसनासाठी जागतिक स्पर्धात्मक टेंडर मागविण्यात येत आहेत. या कामासाठी २०२३-२४ मध्ये २०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com