Thane : 600 कोटींच्या रस्त्यांचे ऑडिट; ठेकेदारांचे धाबे दणाणले

Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरात सुरु असलेल्या सुमारे ६०० कोटींहून अधिकच्या रस्त्यांच्या कामांचे थर्डपार्टी ऑडिट सुरु करण्यात आले आहे. मुंबई आयआयटीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Thane Municipal Corporation
Ashish Shelar: कॅगने उघड केलेल्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी कराच

ठाणे महापालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या मालकीचे 384 कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 205 कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी.चे आहेत व उर्वरित डांबरी रस्ते आहेत. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण ठाण्यात मजबूत रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यामध्ये शासनाकडून पहिल्या टप्प्यात 214 कोटी व दुसऱ्या टप्प्यात 391 कोटी असे एकूण 605 कोटी अनुदान मंजूर झालेले आहे. या अनुदानातून शहरातील 283 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यामध्ये 10.46 कि.मी. काँक्रीट रस्ते, 59.31 कि.मी. युटीडब्ल्यूटी व 46.77 कि.मी. डांबरी रस्ते व 19.12 कि.मी. चे मास्टीक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात येत असून यामध्ये महापालिका परिक्षेत्रातील प्रभाग समितीमधील रस्त्यांचा समावेश आहे. ही सर्व रस्त्यांची कामे मे 2023 पूर्वी पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

Thane Municipal Corporation
मुंबई-वडोदरा महामार्ग भूसंपादनातील अनियमिततेच्या चौकशीसाठी SIT

महापालिकेच्या निधीमधून महापालिकेच्या अखत्यारीतील असलेले इतर सर्व प्रकारचे रस्ते सुस्थितीत राखण्याकरीता डांबरीकरण पद्धतीने रिसरफेसिंग, सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. ही सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करुन तद्नंतर महापालिकेच्या रस्त्यावर येत्या पावसाळ्यामध्ये खड्डे पडणार नाहीत याची दक्षता घेऊन खड्डे मुक्त ठाणे करण्याचा संकल्प आहे.

Thane Municipal Corporation
Eknath Shinde: लातूर-नांदेड रेल्वेमार्ग प्रस्ताव केंद्राला पाठवणार

ठाणे महापालिका हद्दीत शहर सुशोभिकरण आणि खड्डे मुक्त रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार दोन टप्यात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे अंतिम टप्यात आहेत. तर दुसऱ्या टप्याच्या कामांना देखील वेग आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 214 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 391 कोटी असे एकूण 605 कोटी निधी रस्त्यांसाठी मिळणार आहेत. त्यातून शहरातील 283 रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार सुरू असलेल्या आणि नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही सर्व रस्त्यांची कामे 31 मे पूर्वी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन आहे.

Thane Municipal Corporation
Mumbai : 'महाकाली, देवीपाडा गृहनिर्माण प्रकल्पाचे काम वेळेत करणार'

ही कामे दर्जेदार व्हावी यासाठी थर्ड पार्टी ऑडिट केले जात आहेत. आयआयटीचे के.व्ही. कृष्णराव यांच्या नेतृत्वाखालील पथक गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्त्यांची पाहणी करीत आहे. ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांसमवेत ही पाहणी सुरु आहे. यानंतर आयआयटीकडून रस्त्यांच्या कामांबाबतचा सविस्तर अहवाल महापालिका प्रशासनाला सोपविला जाईल. त्यानुसार कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com