Ashish Shelar: कॅगने उघड केलेल्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी कराच

Ashish Shelar
Ashish ShelarTendernama

मुंबई (Mumbai) : कॅगने (CAG) केलेल्या चौकशीमध्ये मुंबई महापालिकेतील (BMC) ८,४८५  कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला असून, या मागचा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

Ashish Shelar
Good News! वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून सुटण्याची वेळ बदलली?

महापालिकेच्या ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळ्यावर कॅगने ताशेरे मारले आहेत. ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते त्याचे वर्णन करायचे तर 'कट, कमिशन आणि कसाई' असे करता येईल. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा थेट आरोप शेलार यांनी केला आहे.

कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

Ashish Shelar
MGNREGA : रोजगार हमीवरील मजुरीत 20 रुपयांनी वाढ; आता मजुरी होणार..

टेंडरविना कामे दिली आहेत, टेंडर पेक्षा जास्त काम दिली आहेत, टेंडर पडताळणी विना टेंडर अपात्र असलेल्यांना कामे दिली आहेत. काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर ‍दिले, पण ती एकच कंपनी आहे. हा टेंडर अटी-शर्तीचा भंग आहे, टेंडरमध्ये फेरफार आहे. कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल इतका मोठा हा घोटाळा असल्याचा आरोप शेलार यांनी केला. सॅपमध्ये टेंडर फेरफार झाला आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

परेल टीटी उड्डाण पूल, मिठी नदी अशा वरळी, वांद्रे, 'मातोश्री' जवळची अनेक कामे टेंडर न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळ्याची एसआयटी चौकशी व्हावी, सूत्रधार कोण, हे उघड व्हायला हवे, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com