Mumbai : नंदुरबार जिल्ह्यातील 'त्या' प्रकल्पाच्या 161 कोटींच्या खर्चाला सरकारचा Green Signal

Dam
DamTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

Dam
Ajit Pawar : कोल्हापूरकरांना उपमुख्यमंत्री अजितदादांनी काय दिली गुड न्यूज?

नागन मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत आहे. नागन मध्यम प्रकल्पातून तापी खोरेतील नागन नदीवर एकूण २६.४८ दलघमी साठवण क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. हा प्रकल्प भरडू गावाजवळ आहे.

Dam
Mumbai Pune Expressway वरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! मिसिंग लिंकच्या टोलबाबत आली महत्त्वाची बातमी

या प्रकल्पामुळे नवापूर तालुक्यातील १६ गावातील २ हजार ४८६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेतर्गंत १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com